– जेसीबी, पोकलेन व मिक्सर मशीनचा समावेश
The गडविश्व
एटापल्ली, ३ मार्च : एटापल्ली तालुक्यातील पूरसलगोंदी- अलेंगा मार्गावरील दामिया नाल्याजवळ नक्षल्यांनी पुन्हा एकदा बांधकामावरील वाहनांची जाळपोळ केल्याची घटना पुढे येत आहे. जाळपोळ केलेल्या वाहनांमध्ये जेसीबी, पोकलेन व मिक्सर मशीनचा समावेश आहे.
दोन दिवसांपूर्वी भामरागड तालुक्यात देखील बांधकामावरील वाहनांची नक्षल्यांनी जाळपोळ केली होती.पुन्हा एकदा नक्षली सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.
गुरुवारी रात्रो ८ वाजताच्या सुमारास पूरसलगोंदी- अलेंगा मार्गावर पुलाच्या बांधकामासाठी उभे असलेल्या वाहनांना नक्षल्यांनी पेटवून दिले. सदर घटनेने बांधकाम कंत्राटदाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The Gdv) (Naxal)