नक्षल्यांचे तांडव : पंधराहुन अधिक वाहनांची केली जाळपोळ

3802

– परिसरात दहशत, पोलीसांची सतर्कता, घटनेने खळबळ 
The गडविश्व
दंतेवाडा, दि. २७ : जिल्हयातील भान्सी नजीकच्या डांबर प्लांटमध्ये नक्षल्यांनी पंधराहुन अधिक वाहनांची जाळपोळ केल्याची माहिती पुढे येत आहे. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली असुन दहशतीचे वातावरण पसरले आहे.
जिल्ह्यातील भानसी पोलीस ठाण्याच्या १ किलोमिटर अंतरावर डांबर प्लांट असुन तेथे रात्रोच्या सुमारास पन्नासहुन अधिक नक्षली पोहचले व प्रथम प्लांटच्या चौकीदाराला ओलीस ठेवत वाहनांच्या इंधन टाक्या फोडून आग लावल्याचे सांगण्यात येत आहे. घटना घडवून आणल्यानंतर नक्षली जगंलात पसार झाले. याबाबत माहिती पोलीसांना मिळताच घटनास्थळी दाखल होत वाहनांना लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम केल्याचे कळते. मात्र तोपर्यंत वाहन संपूर्ण जळाले होते. या घटनेत खासगी कंस्ट्रक्शन कंपनीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. जाळपोळीत जेसीबी, हाइवा, शिफ्टर, टिप्पर, पोकलेन, मिक्सचर मशीन, पिकअप और हाईड्रिल मशीनीचा समावेश आहे. चौकीदाराला नक्षल्यांनी कोणतेही नुकसान पोहचविले नाही. दरम्यान छत्तीसगडमध्ये काही दिवसांपासून नक्षल्यांचा धुमाकुळ सुरू असुन हत्या, पोलीसांवर हल्ले, आदि घटना समोर येत असल्याने नक्षली सक्रीय असल्याचे दिसुन येत आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news, cg news, dantewada, bhansi)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here