अवैध दारु तस्करांच्या आवळल्या मुसक्या : वाहनासह लाखोंचा मुद्देमाल जप्त

159

– दारू वाहतुकीसाठी वाहनाच्या डाल्यात बनवले कप्पे
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही छुप्या मार्गाने दारु विक्री व वाहतुक होत असते. असे असताना दारू तस्करांनी वाहनाच्या डाल्यात कप्पे तयार करून त्यात दारूचे बॉक्स लपवून दारू वाहतूक करण्याची शक्कल लढवली मात्र मुलचेरा पोलिसांनी हि शक्कल उधळून लावत वाहनासह ७ लाख ७६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी प्रशिल शंकर ढोले, तेजस हंसराज गिरी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर अरविंद निवेलकर रा.जंगम वस्ती चंद्रपुर ह. मु. घोट ता. चामोर्शी जि. गडचिरोली हा फरार असून आरोपीचे शोध पोलीस घेत आहे.
जिल्ह्रात छुप्या रीतीने होणाऱ्या दारु विक्री व वाहतुकीविरुध्द पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी अवैद्य दारु विक्रीवर अंकुश लावण्याबाबत दिलेल्या आदेशान्वये २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ०६ वा. एमएच ३४ बिझेड ३१५७ क्रमांकाची पिकअप वाहनातुन अवैधरित्या दारु विक्री होत असल्याची गोपनिय माहिती मिळाली असता पोस्टे मुलचेरा येथील अधिकारी अंमलदार यांनी नाकाबंदी करुन ये-जा करणाऱ्या वाहनास थांबवुन वाहनाची तपासणी केली. वाहनाचे डाल्यामधील काही भाग हा वेल्डिींग करुन त्याच्या आतमध्ये काही बॉक्स ठेवलेले दिसुन आले तसेच सदर वाहनाची पाहणी केली असता सदर बॉक्समध्ये देशी व विदेशी दारु मिळुन आले. यावेळी एकूण ३ लाख २६ हजार २०० रुपये किमतीची दारू व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला चार चाकी पिकअप वाहन किंमत ४ लाख ५० हजार रुपये असा एकूण ७ लाख ७६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई दरम्यान दोघांना ताब्यात घेतले असून फरार आरोपीचा शोध पोलीस करीत आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे मुलचेरा येथील पोउपनि संदिप ठाकरे हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) एम. रमेश सा. व उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे मुलचेरा प्रभारी अधिकारी सपोनि. अशोक भापकर व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.
तसेच यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी सांगितले की, गडचिरोली पोलीस दल हे आरोपीच्या नेहमीच एक पाऊल पुढे चालत आहे. सदर वेळी आरोपीने खुप शक्कल लढवुन पोलीसांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचा प्रयत्न केला परंतु गडचिरोली पोलीस दलाने त्यांचा तो प्रयत्न हाणुन पाडला आहे. तसेच जिल्ह्रातील नागरीकांना आवाहन केले की, जिल्ह्रात कुठेही अशा पद्धतीने होत असलेल्या अवैध दारु अथवा तत्सम अंमली पदार्थाच्या वाहतुकीबद्दल माहिती मिळताच गडचिरोली पोलीस दलाशी संपर्क साधावा.

(the gadvishva, the gdv, gadchiroli news, crime news, mulchera, sp nilotpal)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here