– दोन दिवस उत्सवात रंगणार महाराष्ट्राच्या प्रसिध्द कलाकारांच्या कला व रेला नृत्य स्पर्धा.
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम, माओवादग्रस्त व आदिवासी बहुल असून येथील आदिवासी नागरीकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ‘प्रोजेक्ट उडान’ च्या माध्यमातुन विविध शासकिय योजना मिळवुन देत विकासाच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गडचिरोली जिल्हयातील आदिवासी बांधवांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याकरीता व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने 01 ते 03 फेब्रुवारी 2024 या काळात गडचिरोली पोलीस दलामार्फत “गडचिरोली महोत्सव” व 04 फेब्रुवारी 2024 रोजी “महामॅरेथॉन 2024” चे आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील जिल्हा परिषद कार्यालयाचे प्रांगणात करण्यात आले असुन, काल 02 फेब्रुवारी 2024 रोजी गडचिरोली महोत्सवाचे उद्घाटन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे हस्ते पार पडले.
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला गडचिरोली महोत्सव हा तीन दिवस चालणार असुन, या महोत्सवाचे विशेष आकर्षण आदिवासी समुह नृत्य स्पर्धा, विर बाबुराव शेडमाके कब्बड्डी स्पर्धा व बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धा असुन दुर्गम व अतिदुर्गम भागातुन आलेल्या संघामध्ये हया स्पर्धा अत्यंत चुरशीच्या होणार आहेत. तसेच गडचिरोली जिल्हयातील विविध बचत गट आणि विविध संस्था आपल्या उत्पादनाचे व वस्तुंचे स्टॉल लावणार आहेत. यासोबतच हस्तकलेच्या वस्तुंचे स्टॉल उपस्थित नागरीकांरीता उपलब्ध असणार आहेत. तसेच 02 व 03 फेब्राुवारी रोजी सायंकाळी 06 वा. च्या नंतर सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील प्रसिध्द कलाकार आपली कला सादर करणार असून गडचिरोली जिल्हयातील स्थानिक कलाकरांनी सुद्धा यात सहभाग घेतलेला आहे. यासोबतच आयोजीत करण्यात आलेल्या महामॅरेथॉन 2024 या स्पर्धेत जिल्हयातील अतिदुर्गम भागातील 13000 हुन अधिक स्पर्धक सहभागी होणार आहे. सदर स्पर्धेत वेगवेगळया वयोगटासाठी वेगवेगळे अंतर असुन त्यामध्ये 21 किमी, 10 किमी, 05 किमी, 03 किमी. स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंग अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात गडचिरोली पोलीस दलाचे वतीने गडचिरोली महोत्सव प्रारंभ होत असल्याबाबतची घोषणा करुन ‘प्रोजेक्ट उडान’ च्या माध्यमातुन गडचिरोली महोत्सवाकरीता अथक परीश्रम घेत असलेले पोलीस अधीक्षक, गडचिरोली व त्यांच्या संपुर्ण टीमचे मन:पुर्वक व भरभरुन कौतुक केले. दरवर्षी अशाच प्रकारे गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने गडचिरोली महोत्सव आयोजीत करावे, जेणेकरुन जिल्हयातील सर्व खेळाडुंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळु शकेल असे सागिंतले.
या गडचिरोली महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, जिल्हाधिकारी संजय मीणा सा., पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) शयतिश देशमुख सा, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी एम. रमेश सा., उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली मयुर भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली सुरज जगताप तसेच गडचिरोली पोलीस दलातील पोस्टे/उपपोस्टे/पोमकें व शाखेतील अधिकारी व अंमलदार हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/उपपोस्टे/पोमकें व सर्व शाखेचे अधिकारी व अंमलदार अथक परिश्रम घेत आहेत.
गडचिरोली महोत्सव व महामॅरेथॉन हा पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत उपक्रमाचा एक अविभाज्य भाग असून, या महोत्सवातून गडचिरोलीतील दुर्गम-अतिदुर्गम भागातील हस्तकलाकार व खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा आमचा मनोदय आहे. तसेच या महोत्सवातून गडचिरोली जिल्ह्राचे वैशिष्ट असलेल्या रेला नृत्यास राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण होण्यास निश्चीतच मदत होईल. गडचिरोली महोत्सव व महा मॅरेथॉनमधील सहभागी सर्व खेळाडु व कलाकारांचा उत्साह द्विगुणीत करण्याकरीता सर्व नागरीकांनी या महोत्सवामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.
– नीलोत्पल,
पोलीस अधीक्षक, गडचिरोलीगडचिरोली पोलीस दल आयोजीत गडचिरोली महोत्सव व महा मॅरेथॉन 2024 हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून, याद्वारे गडचिरोलीतील युवक-युवतींना व हस्तकलाकारांना आपल्या खेळाचे व कलेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली आहे. या महोत्सवास गडचिरोली जिल्ह्रातील नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला या करीता मी त्यांचे अभिनंदन करतो व आव्हान करतो.
-संजय मीणा,
जिल्हाधिकारी, गडचिरोली