राष्ट्रवादी काँग्रेस पवारांचीच ; निवडणूक आयोगाचा निर्णय

619

The गडविश्व
मुंबई, दि. ०६ : राष्ट्रवादी काँग्रेस हा अजित पवार गटाचा असल्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने दिला आहे. आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे. शरद पवार गटाने उद्या ७ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत तीन नावे सादर करण्यास सांगितले आहे.
आम्ही आतिशय आनंदी आहोत. निवडणूक आयोगाने हा महत्त्वाचा निर्णय देत भारतीय लोकशाही सिध्दातांवर शिक्कामोर्तब केले आहे. याचे अंत:करणापासून स्वागत आहे. याचा आम्हाला आनंद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही ठरवलेली ध्येय धोरणे ठरवून आम्ही काम करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून राज्यात अजित पवारांच्या नेतृत्त्वाखाली आपली भूमिका योग्य पध्दतीने बजावेल आणि राज्यातील जनतेचा फार मोठा पाठिंबा पाठबळ आम्हाला मिळेल असा विश्वास मी व्यक्त करतो असे अजित पवार गटाचे प्रवक्ते सुनील तटकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाचा निकाल विनम्रपणाने स्वीकारत आहे असे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here