जिल्हा स्तरावर चाईल्ड हेल्पलाईन (CHL) 1098 कार्यान्वीत

93

The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : महिला आणि बाल विकास मंत्रालय नवी दिल्ली यांन मिशन वात्सल्य योजनेची मार्गदर्शक पुस्तीका जाहीर करण्यात आली आहे. सदर मार्गदर्शिकेनुसार महिला व बाल विकास विभाग जिल्हा बाल संरक्षण कक्ष अंतर्गत जिल्हयामध्ये बालकांसाठी चाईल्ड हेल्पलाईन (CHL) 1098 सेवा कार्यान्वीत करण्यात आली आहे.
बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 व 2021 मध्ये झालेल्या सुधारणानुसार चाईल्ड हेल्पलाईन महिला व बाल विकास विभागाच्या राज्य आणि जिल्हयाच्या मार्फत राबवली जात आहे. 31 मार्च 2023 रोजी केंद्र शासनाने चाईल्ड हेल्पलाईन (CHL) करिता स्वतंत्र मानक संचालन प्रणाली SOP विकसीत केली आहे. त्यानुसार चाईल्ड हेल्पलाईन कक्ष 24 X 7 म्हणजेच वर्षाचे सर्व दिवस निरंतर कार्यरत असेल. तरी काळजी व संरक्षणाची गरज असलेली व संकटग्रस्त किंवा कोणत्याही मदतीची आवश्यकता असलेल्या बालकाला चाईल्ड हेल्पलाईन 1098 यावर संपर्क करण्यात यावे. बालकाला आवश्यक मदत पुरवल्या जाईल. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, प्रकाश भांदककर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here