समृद्धी महामार्गावर नागपूर बस पेटली ; २५ प्रवाशांचा मृत्यू

3324

– नागपूरवरून पुण्याला जात होती बस
The गडविश्व
नागपूर, १ जुलै : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका संपता संपेना. नागपूरवरून पुण्याला जाणाऱ्या बसचा शनिवारी पहाटे भीषण अपघात घडला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये बस पूर्णतः जळून खाक झाली यात २५ जणांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर आठ प्रवाशी जखमी झाले आहेत.
मिळत असलेल्या माहितीनुसार ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. तर समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजाजवळील पिंपळखुटा गावाजवळ बस रस्ता दुभाजकावर आदळली पलटली यानंतर बसला आग लागली. प्रवासी झोपेत असल्यामुळे त्यांना बाहेर पडता आला नाही. दरम्यान बस ने पेट घेतला यात २५ जणांचा जळून मृत्यू झाला आहे यात तीन लहान मुलांचाही समावेश आहे असे कळते. तर आठ जण बचावले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बसमधून एकूण ३३ प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती मिळत आहे.

(the gdv, the gadvishva, samrudhhi mahamarg, nagpur bus, Nagpur bus catches fire on Samriddhi highway; 25 passengers died)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here