आरमोरीच्या वैनगंगा नदीपात्रात उडी घेतलेल्या ‘त्या’ तरुण महिला पोलीस शिपायाचा मृतदेहच आढळला

4517

– रात्रो उशिरापर्यंत सुरू होती शोधमोहीम
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, १ जुलै : तालुका मुख्यालयापासून ब्रम्हपुरी मार्गावर असलेल्या वैनगंगा नदी पुलावरून नदीपात्रात तरुण महिला पोलीस शिपायाने उडी मारल्याची खळबळजनक घटना शुक्रवार ३० जून रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. उशिरापर्यंत शोधमोहीम राबविली असता रात्रो ९.३० वाजताच्या सुमारास अखेर तिचा मृतदेहच मिळाला. सदर घटनेने पोलीस विभागासह परिसरात खळबळ उडाली.
शारदा नामदेव खोब्रागडे (३०) असे नदीपुलावरून उडी घेतलेल्या तरुण महिला पोलीस शिपायाचे नाव आहे. ती मूळची चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील शिवणी येथील असल्याचे कळते तर सध्या भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलीस स्टेशनला कार्यरत होती अशी माहिती आहे.
३० जून रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास शारदा खोब्रागडे ने आरमोरी येथील वैनगंगा नदी पुलावर आपली दुचाकी उभी केली तसेच मोबाईल सुद्धा तिथेच ठेवून थेट नदीपात्रात उडी घेतली. हा प्रकार नागरिकांना माहित होताच याबाबतची माहिती पोलीस ठाणे आरमोरी येथे दिली. तात्काळ पोलीस पथक तसेच आरमोरी तहसिल कार्यालयाच्या बचाव पथकांनी धाव घेत नदीपात्रात शोधमोहीम राबविली. संध्याकाळ पर्यंत शोधमोहीम राबवूनही मात्र थांगपत्ता लागला नाही. यावेळी घटनेची माहिती शहरात पसरताच बघ्यांची गर्दी जमली होती मात्र उशिरा रात्रीपर्यंत शोधमोहीम सुरूच असतांना अखेर शारदा खोब्रागडे चा मृतदेहच मिळाला.
याच वैनगंगा नदी पात्रता गतवर्षी एका महिलेने उडी घेतली होती. नदीपात्र काहीप्रमाणात कोरडे पडले होते मात्र काही दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावल्याने नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली तसेच गोसेखुर्द धरणाच्या पाण्याच्या विसर्गाने पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने शारदा खोब्रागडे ह्या पाण्यात वाहून इत्ररत तर गेल्या नाही असा तर्क लावण्यात येत होता मात्र शोधमोहीम अखेर काही तासात त्यांचा मृतदेहच आढळुन आला. त्यांनी नदी पात्रता उडी कोणत्या कारणाने घेतली हे तरी अद्याप कळलेले नाही. सदर घटनेने मात्र पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

(the gdv, the gadvishva, gadchiroli news, armori news, vainganga river, The dead body of ‘that’ young woman police constable who jumped into the Wainganga riverbed of Armory was found)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here