– यंग मुस्लिम फोरमचा पुढाकार, मागण्याचे निवेदन केले सादर
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (चेतन गहाने) २९ सप्टेबर : शहराच्या इतिहासात प्रथमच अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाचे बबलू भाई हूसैनी यांची कुरखेडा नगरपंचायतच्या उपाध्यक्ष पदासह जिल्हा नियोजन समितीवर वर्णी लागली. या भूषणावह कामगीरीस पात्र ठरलेले हूसैनी यांचा आज यंग मुस्लिम फोरमचा वतीने येथील आझाद चौकात जाहिर नागरी सत्कार करण्यात आला व त्याना विविध मागण्याचे निवेदन देत त्या मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.
भाजपा अल्पसंख्यक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष असलेले हूसैनी हे येथील जामा मस्जिद कमेटीचे उपाध्यक्ष सूद्धा आहेत. विविध समाजिक कार्यात ते अग्रेसर असतात. नूकतेच त्यांची अविरोध निवड नगर पंचायत उपाध्यक्ष पदावर करण्यात आली आहे. तसेच जिल्हा नियोजन समीतीवर सूद्धा त्यांची वर्णी लावण्यात आली आहे. सदर बाब समाजाकरीता भूषणावह आहे, या कामगीरीची दखल घेत त्यांचा जाहिर नागरी सत्कार करण्यात आला व त्याना येथील आझाद चौकात असलेला मुस्लिम समाज भवनाचा वाढीव बांधकामाला मंजूरी प्रदान करीत निधी उपलब्ध करून देण्याची व आझाद चौकाचे अधिकृत नामकरण मौलाना अबुल कलाम आजाद असे करण्याची मागणी निवेदना द्वारे केली.
यावेळी हूसैनी यांनी भवनाचे वाढीव बांधकाम व चौकाचे नामकरण या दोन्ही मागण्या तिन महिण्याचा कालावधीत आपल्या स्तरावरून पाठपूरावा करीत मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी जामा मस्जिद चे अध्यक्ष मसूद शेख, यंग मुस्लिम युवक फोरमचे अध्यक्ष न्याज़ सय्यद, उपाध्यक्ष तौकीर शेख, सचिव काशीद कूरैशी, आसीफ शेख, बिलाल खाणानी, साजीद शेख, शादाब खान, शमीम शेख, तौसीफ शेख, असद खान, शहेबाज शेख, मून्ना शेख, रेहान खान अयाज़ सय्यद, ओमी खान, जमील शेख सोहेल खान, इरशाद अली सय्यद, फाजील शेख, नवेद शेख, ज़ोहेल खान, हमजा खान रेहान पठान, रज़ा खान, राजा शेख तसेच मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सिराज पठान यांनी केले.
