मुरूमगाव जि.प. उच्च प्रा. केंद्र शाळेत नवी व्यवस्थापन समिती गठित

134

The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ०८ : धानोरा तालुका अंतर्गत मुरूमगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेत मावळते अध्यक्ष शंकरजी कुमरे यांच्या अध्यक्षतेखाली आज ०६ ऑगस्ट २०२५ रोजी शाळा व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया पार पडली. या निवड प्रक्रियेत सर्वानुमते खेमराज खोब्रागडे यांची अध्यक्ष पदावर तर ओमप्रकाश उसेंडी यांची उपाध्यक्ष पदावर एकमताने निवड करण्यात आली.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गायत्री खेवले, केंद्रप्रमुख अरुण सातपुते, ग्रामपंचायत सदस्य अभिजित मेश्राम, सुरेंद्र कोठवार, जगदीश बावणे, रुपेश शिवणकर, सौ. संगीता भडके, सौ. सुमन किरंगे, सौ. रविता शेडमाके आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नव्याने निवड झालेल्या समिती पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
#thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanoranews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here