व्यसन उपचार शिबिराला रुग्णांचा वाढता प्रतिसाद

167

– तीन गावांमधील ५९ जणांनी घेतला लाभ
The गडविश्व
गडचिरोली, १२ डिसेंबर : गाव संघटनेच्या मागणीनुसार मुक्तीपथतर्फे गावागावात व्यसन उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. नुकतेच तीन गावात आयोजित शिबिराचा एकूण ५९ रुग्णांनी लाभ घेतला.
कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे एक दिवसीय व्यसन उपचार शिबिरात एकूण २८ पेशंटनी नोंदणी केली व २५ पेशंट नी पूर्णवेळ उपचार घेतला. केस हिस्ट्री स्पार्क कार्यकर्ती कान्होपात्रा राऊत हिने घेतली. समुपदेशन प्राजु गायकवाड यांनी केले. प्रभाकर केळझळकर यांनी केस हिष्ट्री घेत रुग्णांना दारूचे दुष्परिणाम पटवुन दिले. रूग्णांची नोंदणी विनोद पांडे व शिबिराचे नियोजन मयूर राऊत यांनी केले. चामोर्शी तालुक्यातील आमगाव महाल येथील शिबिरात २५ रुग्णांनी नोंदणी केली व २० रुग्णांनी पूर्ण वेळ उपचार घेतला. रुग्णांची केस हिस्ट्री छत्रपती घवघवे , सोनी सहारे यांनी घेतली. रुग्णांना समुपदेशन करीत प्राजक्ता मेश्राम यांनी धोक्याचे घटक, दारूचे दुष्परिणाम सांगितले. शिबिराचे आयोजन आनंद सिडाम यांनी केले. यावेळी तन्मय मंडल उपस्थित होते. धानोरा तालुक्यातील मिचगाव खुर्द येथे एकदिवसीय गाव पातळी शिबिर घेण्यात आले. शिबिरात १४ रुग्णांनी पुर्ण उपचार घेतला. अशा एकूण ५९ रुग्णांनी उपचार घेत दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याचा निर्धार केला आहे.
दारू सोडण्याची इच्छा असलेल्या रुग्णांना मुक्तीपथने गावातच उपचाराची सोय उपलब्ध करून दिल्याने आतापर्यंत अनेक रुग्णांनी शिबिराच्या माध्यमातून उपचार घेतला आहे. सोबतच रुग्णांचा नियमित पाठपुरावा करून सध्यस्थीती जाणून घेतली जाते. या शिबिरांना रुग्णांचा वाढता प्रतिसाद दिसून येत आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here