लोक कलावंत गौरव सोहळ्यात धानोरा येथील माऊली भजन मंडळाचा गौरव

252

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. १८ : जगद्गुरु संत तुकाराम महाराज देवस्थान तसेच सर्वधर्मसमभाव सांस्कृतिक मलामंच यांच्या वतीने आयोजित लोककलावंतांचा गौरव सोहळा वर्धा येथे पार पडला. या कलावंत गौरव सोहळ्यात धानोरा येथील माऊली महिला भजन मंडळाचा गौरव करण्यात आला.
महाराष्ट्रत भजन, कीर्तन, भारुड खडी गंमत,भागवत प्रवचन, पोवाडे अशा विविध सांस्कृतिक , धार्मिक व प्रबोधनाचे कार्यक्रम केले जातात. या माध्यमातुनच भक्ती मार्गाने देवाचे स्मरण केले जाते. मनोरजनही केले जाते पण समाज जागृती करणाऱ्या कलावंतांचा गौरव सोहळा नुकताच वर्धा येथे पार पडला. या सोहळ्यात धानोरा येथील महिला मंडळांचा सत्कार करून गौरविण्यात आले.
यावेळी मा. खासदार सुबोत मोहिते, डॉ. उपेंद्र कोठेकर, सुमित वानखडे, आमदार पंकज भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात धानोरा येथील किरण दिलीप बर्वे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भजन मंडळाच्या यामिना शेरकि, सुनंदा कुळमेथे, वंदना आळे,शुंभागी कुनघाडकर,सुमन बावणे, नंदा रामपुरकर,लिना साळवे, किर्ती खरवळे, सुनंदा वाघाडे, वंदना रामपुरकर, अर्चना रांखडे, चेतना परचाके, नुरजहा पिरानी, गायत्री श्रीपतवार व गौरी कुर्जेकर आदि धानोरा येथील महिला उपस्थित होते. देवस्थानचे अध्यक्ष निर्गुण खैरकार व संस्थेच्या च्या अध्यक्षा दीपमाला मालेकर, पंकज येसनकर यांच्या पुढाकाराने हा गौरव सोहळा पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here