पोलीस दलाची मोठी कारवाई : चकमकीत २२ नक्षली ठार

3102

– घटनस्थळावरुन शस्त्रे आणि नक्षली साहित्य जप्त, ठार नक्षल्यांचा आकडा वाढण्याची शक्यता 
The गडविश्व
बस्तर, दि. २० : छत्तीसगडमधील बस्तर भागात सुरक्षादलांनी आज दोन ठिकाणी नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई केली, ज्यात २२ नक्षली ठार झाले. बीजापूर आणि कांकेर जिल्ह्यांमध्ये झालेल्या या चकमकीत नक्षलवाद्यांच्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रे, स्वयंचलित शस्त्रे आणि नक्षली साहित्य जप्त करण्यात आले आहे.https://x.com/ANI/status/1902648853549183259?s=19
सुरक्षादलाला गंगालूर परिसरात नक्षलवाद्यांच्या तळांची माहिती मिळाल्यानंतर दंतेवाडा-बीजापूर सीमेजवळ संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली. चकमकीत १८ नक्षली बीजापूरमध्ये तर ४ नक्षली कांकेरमध्ये ठार झाले. दुपारपर्यंत गोळीबार सुरूच होता, आणि सध्या घटनास्थळी शोधमोहीम सुरू आहे.
या चकमकीने नक्षलवाद्यांना मोठा धक्का दिला असून, मृत्यू झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या आणखी वाढू शकते, अशी माहिती समोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here