कुरखेडाच्या लताबाई सहारे यांची आदिवासी भागात जैवइंधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी

406

– एमसीएल तर्फे मुंबई येथे सत्कार
गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, १३ ऑगस्ट : ग्राम विकास फार्मर प्रोड्युसर कंपनी, कुरखेडाच्या संचालीका लताबाई सहारे यांचा हॉटेल सहारा स्टार मुंबई येथे जैवइंधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील जनतेकरीता ही अभिमानाची बाब आहे.
१० ऑगस्ट २०२३ ला जागतिक जैवइंधन दिनानिमित्त एमसीएल द्वारे हॉटेल सहारा स्टार मुंबई येथे भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील श्रीमती लताबाई बंडूजी सहारे यांनी कुरखेडा सारख्या मागासलेल्या भागात जैवइंधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा एमसीएल तर्फे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमात एमसीएलचे सलाहकार व रचनाकार डॉ. शाम घोलप, एमसीएलचे डायरेक्टर डॉ. लवेश जाधव, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्राची ढोले, कार्तिक रावल आणि संपूर्ण भारतातील विविध तालुक्याचे एमपीओ ऑनर उपस्थित होते.
ग्लोबल वॉर्मिग, हवामान बदल, प्रदूषण, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या अडचणी अश्या अनेक संकटावर मात करण्यासाठी एमसीएल आज कार्य करीत आहे. पेट्रोल, डिझेल व कोळसा यापासून होणारा प्रदूषण आणि यासाठी इतर देशावर भारताची निर्भरता बघता भारताला इंधन क्षेत्रात २०३० पर्यंत आत्मनिर्भर बनवण्यासाठी एमसीएल एक मिशन घेऊन संपूर्ण भारतात काम करत आहे. एमसीएलच्या या ध्येयामुळे सर्व शेतकरी, महिला आर्थिकदृष्ट्या समृध्द होणार आहेत. भारतातील बेरोजगारी कमी होणार आहे, भारतातील प्रत्येक गावांचा विकास होणार आहे आणि या धरती मातेच ग्लोबल वॉर्मिग, हवामान बदल आणि प्रदूषण या संकटापासून रक्षण होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here