The गडविश्व
गडचिरोली , १३ ऑगस्ट : नुकताच राज्य राखीव पोलीस दल भरतीचा निकाल जाहीर झाला असून यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार गडचिरोली येथील लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी तर्फे करण्यात आला.
लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी तर्फे राज्य राखीव पोलीस दलात (SRPF) निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता.
राज्य राखीव पोलीस दलात निवड झालेल्या कौशिक दुधे, समीर कांबळे, गौरव तीमरम, आतिश, सागर व विनोद मंटकवार या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.या दरम्यान निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राज्य राखीव पोलीस दलाचा नुकताच निकाल जाहीर झाला. या परीक्षेत लक्षवेध अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले असून समीर कांबळे या विद्यार्थ्याने लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमीची परंपरा कायम राखत प्रथम स्थान पटकाविले आहे.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लक्ष्यवेध अकॅडमीचे संचालक प्रा. राजीव सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. महेश सर यांनी केले प्रास्ताविक राजीव सर यांनी तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषण देवतळे सर यांनी केले तर आभार अकॅडमी मधील विद्यार्थी शुभम ने मानले.