The गडविश्व
गडचिरोली, ५ ऑगस्ट : जिल्ह्यातील तहसील कार्यालय कुरखेडा हे राज्यातील पहिले मोबाईल एप्लिकेशन असणारे कार्यालय बनले आहे.
नागरिक तसेच कार्यालयीन कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी उपयुक्त नाविन्यपूर्ण Mobile Application तहसील कार्यालय, कुरखेडा तर्फे प्रकाशित करण्यात आले आहे. याचा वापर नागरिकांना आगामी उपक्रम, हवामान सूचना, विविध शासकीय योजना आणि उपयोगी शासन निर्णय यांची माहिती थेट आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी होतो. कार्यालयीन वापरात सर्व तलाठी, मंडळ अधिकारी यांचे कडून माहितीचे संकलन करणे, एकमेकांशी संवाद साधने, कर्मचारी/अधिकारी यांची माहिती तसेच कार्यालयीन महत्वाचे संदेश Push Up Notifications द्वारे पाठविण्यासाठी होतो. असे तहसिलदार, कुरखेडा यांनी कळविले आहे.