कुरखेडा : बोगस आदिवासींच्या अतिक्रमणामूळे आदिवासीवर अन्याय

166

– खेडेगांव (राणी) येथे आदिवासी मेळाव्यात जिवन नाट यांचे प्रतिपादन
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (चेतन गहाने) दि. १५ : शासनाने आदिवासी बांधवाना मुख्य प्रवाहात आणण्याकरीता विविध सोई सवलती व योजना अमलात आणलेल्या आहेत मात्र ग्रामीण दूर्गम भागात दऱ्या-खोऱ्यात नैसर्गिक संसाधनाने आपली उपजिवीका करणारा खरा आदिवासी अद्यापही विकासापासून‌ वंचित आहे. योजनाचा लाभ बोगस आदिवासीच अधिक घेत असल्याने आदिवासी वर अन्याय होत आहे या अन्याया विरोधात आदिवासी समाजाने सामुहिक लढा उभारावा असे आवाहन माजी जि.प.उपाध्यक्ष तथा तालुका कांग्रेसचे अध्यक्ष जीवन पाटील नाट यांनी केले.
आदिवासी भगवान बिरसा मुंडा समीती व राणी दुर्गावती महिला मंडळ खेडेगांव (राणी) यांच्या वतीने क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १४८ व्या जयंती वर्षापूर्ती निमीत्य खेडेगांव येथे आदिवासी समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मेळाव्याचे उदघाटन माजी जि.प सदस्य प्रभाकर तुलावी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमूख अतिथी म्हणून माजी जि.प सदस्य तथा आविसचे सरसेनापती नंदू नरोटे,आविस नेते तथा उपसरपंच मोहन पूराम, माजी सभापती परसराम टिकले, किशोर तलमले माजी सभापती, गिरीधर तितराम नगरसेवक, आशा तूलावी, रामदास मसराम, सरपंच यमूलता पेंदाम, माजी सरपंच ऋषी हलामी आदि उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना नंदू नरोटे यांनी सांगीतले की आदिवासीना संघटीत करण्याची शक्ति त्यांचा सांस्कृतिक अधिष्टानातच आहे. भ्रष्ट मार्गाने व आपली संस्कृति विसरत करण्यात येणारे मार्गक्रमण आदिवासीना गर्तेत लोटेल असे सांगीतले. याप्रसंगी अन्य मान्यवरानी सूद्धा मार्गदर्शन केले. मेळाव्या निमीत्य खूली क्लोज कबड्डी स्पर्धेचे आयोजन सूद्धा करण्यात आले होते. यावेळी स्पर्धेतील विजेता संघाना रोख बक्षीस व मानचिन्ह देत गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व प्रस्ताविक होमराज कवडो आभार पोलीस पाटील परसराम नाट यांनी मानले. यशस्वीतेकरीता मानिक ठोंबरे, माजी सरपंच भागरथा नैताम, शोभा पेंदाम, उत्तम कूंभरे, वृंदा मडावी व गावकर्यानी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here