कुरखेडा : सती नदीच्या पुलाचे बांधकाम संथगतीने, ग्रामस्थांचा तालुक्याशी संपर्क तूटणार ?

917

– सामाजिक कार्यकर्ते रामदास मसराम यांनी केली बांधकामाची पाहणी
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १३ : तालुका मुख्यालयाशी मालेवाडा, कढोली, पूराडा सह कुरखेडा -कोरची या राज्य महामार्गाला जोडणारा सती नदी वरील जुन्या पुलाला तोडत नविन पुलाचे बांधकाम सूरू करण्यात आले आहे. मात्र सदर बांधकाम संथगतीने सुरू असल्याने यंदा पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प पडत ग्रामस्थांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तूटण्याचा धोका निर्माण झाला आहे. या बांधकामाला यूद्ध स्तरावर गती प्रदान करण्याची व नागरीकांना दिलासा देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रामदास मसराम यानी केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत ब्रम्हपूरी ते देवरी या महामार्गाच्या बांधकामाला टप्या टप्याने सुरवात करण्यात आलेली आहे. यावेळी महामार्ग दरम्यान असलेले नदी नाल्यावरील पूलांची क्षमता वृद्धि करीता जुन्या लहान किंवा जिर्ण पुलांना तोडत नविन पूलाचे बांधकाम करण्यात येत आहे. या अंतर्गत कुरखेडा जवळून वाहणाऱ्या जुन्या पुलाला तोडत नविन पूलाचे बांधकाम मागील ६ महिण्यापूर्वी सूरू करण्यात आले आहे. मात्र संबंधित विभाग व कंत्राटदाराच्या नियोजन शून्यतेमुळे बांधकामाला गती नाही. मागे काही तांत्रिक अडचणीमूळे अनेक दिवस बांधकामच ठप्प होते. सध्या पुलाच्या बाजूने कच्चा रपटा तयार करीत येथून वाहतूक सूरू आहे मात्र पावसाळ्यात हा रपटा पुराच्या पाण्यात तग धरू शकणार नाही व या मार्गावरील वाहतूकच ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरील वाहतूक बंद पडल्यास सती नदीच्या पलीकडील तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तालुका मूख्यालयाशी तूटणार आहे. विद्यार्थाना तालुका मूख्यालयात असलेल्या शाळा महाविद्यालयात पोहचणे कठीन ठरणार आहे तसेच ग्रामस्थाना बाजारपेठ व कार्यालयीन कामाकरीता संपर्क तुटल्याने मोठी अडचण होणार आहे. या मार्गावरील बस वाहतूक सूद्धा ठप्प पडणार असून या मार्गाला पर्यायी असलेला मार्ग सूद्धा लांब अंतराचा व अरूंद असल्याने त्या मार्गाने जड वाहतूक शक्य होणार नाही त्यामूळे येथून कोरची व पूढे देवरी तसेच छत्तीसगडकडे जाणारी वाहतूक सूद्धा ठप्प होणार आहे.
या पुलाचा बांधकाम स्थळाला आज सामाजिक कार्यकर्ते रामदास मसराम, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी जि.प.उपाध्यक्ष जिवन पाटील नाटझ वडसा माजी प.स. सभापती परसराम टिकले, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गिरीधर तितराम यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी येथे मोजक्या मजुरांकडून संथगतीने बांधकाम सूरू असल्याचे निदर्शनात आले त्यामुळे संबंधित विभागाने बांधकामाला गती देत यूद्ध स्तरावर बांधकाम करावे व संभाव्य उद्भवणाऱ्या परीस्थीतुन तालुका वासियांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यानी केली आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #kurkheda #sati river kurkheda)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here