– आरोपींना १० वर्षे सश्रम कारावास
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी स्वगावाहून तालुक्याच्या ठिकाणी सायकलने जात असतांना वाटेतच दोघांनी तिचा रस्ता अडवित अत्याचार केल्याची खळबळजनक घटना २०१८ साली कुरखेडा तालुक्यापासून नाजीकच असलेल्या परिसरात घडली होती. या प्रकरणी दोघांवर कुरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणी न्यायालयाने १७ मे २०२४ रोजी दोघांना १० वर्षे सश्रम कारावास व २ लाख ७४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्रशांत उमाजी जोगे, (वय ३२), रविंद्र सुमराज मडावी, (वय २५) दोघेही रा. तळेगाव, तह. कुरखेडा, जि. गडचिरोली असे आरोपींची नावे आहेत.
पिडीत मुलगी ही स्वगावाहून नेहमीप्रमाणे कुरखेडा येथे सायकलने महाविद्यालय शिक्षण घेण्यासाठी जात होती. दरम्यान ३ मार्च २०१८ रोजी वाटेतच प्रशांत जोगे व रविंद्र मडावी या दोघांनी दुचाकीवरून येऊन सायकलल धडक देऊन तिला खाली पाडले. तिला जबरजस्ती दुचाकीवर बसवून बेलगाव ते मालदुगी या जंगल परिसरात कच्या रस्त्याने घेऊन गेले व ५० मिटर रोड पासुन जंगल भागात दुपारी १२ ते १२.३० वाजताच्या सुमारास तिच्यावर अतिप्रसंग केला. यावेळी पिडीतेने विरोध केला मात्र रविंद्र मडावी याने पिडीतेला दोन्ही हाताने पकडुन प्रशात जोगे याने पिडीतेला टोकदार वस्तुने टोचुन जखमी करून तिच्याशी कुकर्म केले. एवढेच नाही तर पिडीतेला हाताबुक्याने जोरदार मारहाण करून याची वाच्यता तु आई वडीलांना सांगितली, तर तुला व तुझ्या आई वडीलांना ठार मारुन टाकीन अशी धमकीही दिली. कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका करत घरी पोहचुन आई वडीलांना सर्व हकिकत सांगितली. ८ मार्च २०१८ रोजी कुरखेडा पोलीस ठाण्यात पीडितेच्या तोंडी रिपोर्टवरून दोघांवर कलम 342, 354 (ड), 366, 376 (1), 323, 506, 34 अंतर्गत गुन्हा दखल करण्यात आला व ८ मार्च रोजी अटक तपास पूर्ण करुन आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आला. सदर खटला सत्र न्यायालयात चालवुन फिर्यादी व वैद्यकीय पुरावा, ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरुन १७ मे २०२४ रोजी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली उत्तम एम. मुधोळकर यांनी आरोपी प्रशांत जोगे व रविंद्र मडावी या दोघांना १० वर्षे सश्रम कारावास व २ लाख ७४ हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पिडीतेला देण्याचा आदेश पारित करण्यात आला. आरोपींनी सर्व शिक्षा ह्या एकत्रितपणे भोगण्याचा आदेश केला.
सरकार तर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल एस. प्रधान यांनी कामकाज पाहिले, तसेच गुन्ह्याचा तपास सहा. पोनि. गजानन ज्ञानदेव पडळकर व पोउपनि. विजय वनकर, पोस्टे कुरखेडा यांनी केला. तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #crimenews #kurkheda #districtcort )