कुरखेडा : ट्रॅक्टरच्या कॅचबिलने दुचाकी चालकाचा घेतला बळी

2942

– रस्त्यावरून ट्रॅक्टर भरधाव
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ११ : ट्रॅक्टरच्या चाकाला लावलेल्या कॅचबिलची धडक बसून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील वाकडी – कुरखेडा मार्गावर गुरुवार ११ जुलै रोजी सकाळी ९ वाजताच्या सुरुमारास घडली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकावर कुरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनिष यादव लोहबंरे (वय २४) रा.वाकडी असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. मृतक मनीष चे कुरखेडा येथे किराणा दुकान आहे. नेहमीप्रमाणे तो गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास वाकडी येथून कुरखेडा येथे दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरच्या कॅचबिलची दुचाकीला जबर धडक बसली. दरम्यान दुचकीचालक खाली कोसळून कॅचबिल मध्ये सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
सदर ट्रॅक्टर वाकडी येथीलच असून ट्रॅक्टर चालक सचिन लालाजी मेश्राम रा.वाकडी याच्या विरोधात भारतिय न्याय संहिता २८१,१०६(१),सह कलम १८४ या नविन मोटार वाहन कायद्यान्वे गुन्हा दाखल करीत ट्रक्टर जप्त करण्यात आला आहे. घटनेचा पूढील तपास साहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे यांचा मार्गदर्शनात कुरखेडा पोलीस करीत आहेत
शेतीचा हंगाम सुरू असल्याने शेतात ट्रॅक्टरद्वारे काम सुरू असते. अशातच ट्रॅक्टरच्या चाकाला लावण्यात आलेल्या कॅचबिलला शेतातील माती चीपकुन ती रस्त्यावर पडल्याने अपघात होण्याची शक्यता असते. ट्रॅक्टरद्वारे रस्त्यावर चिखल माती आल्यास ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात येते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #kurkhedaaccident #tractoraccident)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here