कुरखेडा : उभ्या ट्रकला दुचाकीची जबर धडक, दोघेजण ठार

1042

– गोठणगाव टी पॉईंटवर घडला अपघात
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, १५ मे : रस्त्याच्या कडेला असलेल्या उभ्या ट्रकला दुचाकीने दिलेल्या धकडेत दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना कुरखेडा (kurkheda) येथील गोठनगाव (gothangao) टीपॉईंट वर सोमवार १५ मे रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. दिलीप कुमोटी (३५) रा. अंगारा, ता.कुरखेडा असे अपघातातील एका मृतकाचे नाव असून दुसऱ्याचे नाव कळू शकले नाही.
कुरखेडा येथील गोठनगाव टी पॉईंट हे मुख्य मार्गावर असल्याने या ठिकाणी नेहमीच ट्रक थांबलेले दिसतात. गडचिरोली वरून छत्तीसगड राज्यात जाण्याकरिता वैरागड मार्गे जाणारे ट्रक हे काही काळ कुरखेडा येथील टीपॉईंट वर थांबलेले दिसतात. कधी काळी ट्रकची लांबच लांबही पाहावयास मिळते. दरम्यान गोठनगावकडून कुरखेडा कडे दुचाकीने सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास दोघेजण जात असतांना रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रकला जबर धडक दिली यात दोघेही जण जागीच ठार झाले. मृतक हे शिवणी येथे तेंदुपुडे भरण्याकरिता गेले होते अशी माहिती असून काही कामानिमित्त ते कुरखेडा येथे जात होते असे कळते. दरम्यान हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास कुरखेडा पोलीस करीत आहे. ©©
(the gdv, the gadvishva, kurkheda, gothangao, rod accident, gadchiroli news updates)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here