कुरखेडा : उपजिल्हा रुग्णालय ओपीडी मार्गाच्या फाटकसमोरील नालीवर पडले मोठे भगदाड

763

– नाली बांधकाम नित्कृष्ठ दर्जाचे
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा( चेतन गहाने), दि. ०५ : शहरातील उपजिल्हा रुग्णालय ओपीडी मार्गाच्या फाटकसमोरील नालीवर मोठे भगदाड पडले असुन काही महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेल्या नाली बांधकामाचे पितळ अल्पावधीतच उघडे पडले आहे. सदर काम नित्कृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून येत असून या नाली बांधकामाचा दर्जाही अनुभवास मिळत आहे.
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 543 चे काम प्रगतीपथावर असून कुरखेडा ते गोठणगाव फाटा येथील महामार्गाच्या दोन्ही बाजुने नाली बांधकाम होत आहे. मात्र सदर नाली बांधकामाचा दर्जा हा निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजुने नव्याने नाली बांधकाम करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच सदर नालीवरून ट्रक गेल्याने नाली खचली यात ट्रक फसला होता. हे प्रकरण उघडकीस येतात बांधकाम विभाग जागे झाले होते मात्र सदर कामाची पातळी लक्षात घेतली असता आणखी एक प्रकरण उघकीस आले आहे. शहरातल उपजिल्हा रूग्णालय ओपीडी मार्गाच्या फाटका समोरील नालीवर मोठे भगदाड पडल्याचे निदेर्शनास आले आहे त्यामुळे पुन्हा एकदा बांधकाम विभागाच्या नाली बांधकामाचा दर्जा यावरून दिसून येत आहे. केवळ थातुरमातुर नाली बांधकाम करून शहरवासीयांच्या तोंडाची पाने पुसण्याचा प्रकार सुरू असल्याचे शहरवासियांकडून बोलल्या जात आहे.
निकृष्ट नाली बाधकामाची चौकशी करून त्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, अशा नालीवरून मनुष्यहानी झाल्यास जबाबदार कोण? असा देखिल सवाल शहरवासीयांकडून केल्या जात आहे. |

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolilocalnews #kurkheda )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here