– शेतकऱ्यांमध्ये धास्ती
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, २१ मे : छत्तीसगड राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात मागील महिन्यात दाखल झालेल्या रानटी हत्तींच्या कळपाने आता कुरखेडा तालुक्यात प्रवेश करून धुमाकूळ माजवत गोंदिया जिल्ह्यात आपला मोर्चा वळवला होता मात्र आता पुन्हा यूटर्न घेत कळपाने कुरखेडा तालुक्यातील वडेगाव-आंजनटोला जंगल परिसरात दाखल झाला आहे.
तालुक्याच्या नजीक रानटी हत्तींचा कळप पोहचल्याने शेतकरी धास्तवले आहे. मागील महिन्यात कळपाने कुरखेडा तालुक्यात शेतातील झोपडी, उन्हाळी धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. मात्र एक दोन दिवस तालुक्यात राहून गोंदिया जिल्ह्यात आपला मोर्चा वळवला होता मात्र आता पुन्हा यूटर्न घेत गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यात दाखल झाले असून तालुक्याच्या जवळच असलेल्या वडेगाव-आंजनटोला जंगल परिसरात नागरिकांना हत्तींच्या कळपाचे दर्शन झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा शेतकऱ्यांसह नगरीकांची धाकधूक वाढली असून हत्तींच्या कळपामुळे कोणतेही नुकसान होऊ नये याकरिता वनविभाग नजर ठेवून आहेत.
(the gdv, the gadvishva, kurkheda wadegao aanjantoala forest elephant group coming, gadchiroli news)
