The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १० : ऑल इंडिया आदिवासी एम्पलाइज फेडरेशन शाखा कुरखेडा व समस्त आदिवासी समाज संघटणा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० ते दूपारी ३ वाजे दरम्यान विविध सामाजिक जनजागृती कार्यक्रमासह शहरातून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत पारंपरिक वाद्यासह नाचत गात आदिवासी महिला व पूरूष मंडळी सहभागी झाले होते.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त कुरखेड शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातून रॅली काढण्यात आली. सदर रॅली येथील किसान मंगल सभागृहा पासून सूरू होत आंबेडकर चौक, मस्जिद चौक,राणाप्रताप वार्ड, कुंभीटोला रोड, हनूमान मंदीर, स्टेट बैंक चौक ते मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करीत पुन्हा किसान मंगल सभागृहात पोहचली, तत्पूर्वी तळेगाव मार्गावर असलेल्या देशमाता देवस्थान येथे सेवानिवृत्त आरोग्य पर्यवेक्षक टि डी कोरेटी यांचा हस्ते धार्मिक ध्वजारोहण करण्यात आले तर किसान सभागृहात आयोजित कार्यक्रमात संघटनेचा वतीने तहसीलदार रमेश कुंभरे, पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या सह शासकीय सेवेतून नूकतेच सेवानिवृत्त झालेले तिमेश्वर कोरेटी, रामलाल टेकाम, नारायण कूमरे, राजेश ऊईके, कृष्णा चंन्द्रमा, रमेश मडावी, नंदलाल काटेंगे, गणपत उसेंडी, हरिदास गोटामी, श्रीराम तूलावी,श्रावण गावळे व नाजूकराव नरोटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समाजातील उच्च पदविधारक, शासकीय सेवेत नूकतीच निवड झालेले अधिकारी कर्मचारी,निट परिक्षा, पशूवैद्यकीय परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थी तसेच इयत्ता १० वी व १२ वी तील गुणवंताचा सूद्धा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात नायब तहसीलदार राजकूमार धनबाते तालुका कृषी अधिकारी संजय रामटेके, प्रा. डॉ. मेघराज कपूर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी एम्पलाइज फेडरेशन, आदिवासी हलबा हलबी संघटना, आदिवासी कंवर समाज संघटणा, आदिवासी परधान समाज संघटणा, आदिवासी धृव गोंड समाज संघटणा, आदिवासी गोंड समाज संघटणा, आदिवासी गोंड गोवारी समाज संघटणा,बिरसा ब्रिगेड यांचा वतीने करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमात आदिवासी समाजाचा सर्व ४५ पोटजातीचे बांधव सहभागी झाले होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #gadchirolilocalnews #adivasi din