– महात्मा गांधी तंटामुक्त समिती गेवर्धा यांचा पुढाकार
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, ४ जुलै : तालुक्यातील महात्मा गांधी तंटामुक्त समिती गेवर्धा यांचा पुढाकाराने हनुमान मंदीर देवस्थान खोब्रामेंढा येथे प्रेमीयुगल विवाहबंधनात अडकले आहे.
सचिन विश्वनाथ कवडो मु.पो.गेवर्धा ता.कुरखेडा ता.कुरखेडा असे वराचे नाव आहे तर आणि रोहिणी नारायण चौधरी मु.टेकडी पो.पालांदूर ता.देवरी जि. गोंदिया असे वधू चे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दोघांची ओळख कुरखेडा येथे शिक्षण घेत असताना झाली. दरम्यान ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि शेवटी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी तंटामुक्त समिती पदाधिकारी यांची भेट घेऊन लग्न लावून देण्याची विनंती केली असता तंटामुक्त समितीने यासंदर्भात निर्णय घेऊन श्रीक्षेत्र हनुमान देवस्थान खोब्रामेंढा येथे विवाह लावण्याचे ठरले. २ जुलै २०२३ रोजी तंटामुक्त समिती पदाधिकारी, देवस्थान समिती पदाधिकारी आणि नातेवाईक यांचे उपस्थितीत दोघांचा विवाह पार पाडण्यात आला.
याप्रसंगी सरपंच सुषमा मडावी, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजु बारई, ग्रा.पं. सदस्य रोशन सय्यद, तंटामुक्त समिती सदस्य राजेंद्र कुमरे, सुधीर बाळबुद्धे, जास्वंदा धुर्वे सरपंच खोब्रामेंढा, तुळशीदास बोगा उपसरपंच मालेवाडा तथा सदस्य देवस्थान समिती, उद्धवजी पेंदाम सदस्य आदी उपस्थित होते.