कुरखेडा : वडेगाव येथे १७ वर्षीय विद्यार्थिनीने घेतला गळफास
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १३ : तालुक्यातील वडेगाव येथील चैताली प्रल्हाद बोरकर (वय १७) या तरुणीने घरी कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी १२ सप्टेंबर का दुपारी घडली.
चैताली ही कुरखेडा येथील विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालयात ११ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. दुपारच्या सुमारास घरालगत असलेल्या जुन्या घरात तिने दोरीच्या साहाय्याने आळ्याला गळफास लावून आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय व ग्रामस्थांनी तिला खाली उतरवून उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे दाखल केले. मात्र, तपासणीदरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.
या घटनेची नोंद कुरखेडा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews #आत्महत्या #गळफास #कुरखेडा














