केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत कुलभट्टी शाळा चॅम्पियन

153

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १७ : पंचायत समिती धानोरा अंतर्गत केंद्र मुरुमगाव तर्फे जि . प. उच्च . प्रा.शाळा पंनेमारा येथे आयोजित तीन दिवसीय केंद्रस्तरिय शालेय बाल क्रीडा व कला सांस्कृतिक संमेलनात कुलभट्टी शाळा चॅम्पियन ठरली.
११ ते १२ डिसेंबर दरम्यान झालेल्या क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. त्यात प्राथमिक विभागातून मुले कबड्डी प्रथम खेडेगाव, द्वितीय मरारटोला, खो- खो मध्ये प्रथम कुलभट्टी, द्वितीय मरारटोला, मुली कबड्डी प्रथम हिरंगे, द्वितीय कुलभट्टी, खो- खो मध्ये प्रथम पंनेमारा, द्वितीय हिरंगे संघ विजयी झाले. सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम मुरूमगाव व द्वितीय क्रमांक कुलभट्टी शाळेने पटकाविला.

वैयक्तिक स्पर्धेतही कुलभट्टी शाळा अव्वल

माध्यमिक विभागातून मुलांच्या कबड्डी खेळ प्रकारात प्रथम मुरूमगाव तर द्वितीय क्रमांक कुलभट्टी शाळेने पटकावला. खो-खो मध्ये मुरूमगाव प्रथम व द्वितीय क्रमांक पंनेमारा संघाने प्राप्त केला. मुलींच्या कबड्डीत पुन्हा कुलभट्टी संघाने बाजी मारली तर पंनेमारा शाळेने द्वितीय स्थान प्राप्त केले.
मुलींच्या खो – खो खेळ प्रकारात प्रथम कुलभट्टी संघ, तर द्वितीय स्थान पंनेमारा संघाने पटकाविले. सांस्कृतिक कार्यक्रमात सुद्धा कुलभट्टी संघ अव्वल ठरला , मुरुमगाव संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. वैयक्तिक स्पर्धेत सुद्धा कुलभट्टी संघ अग्रेसर ठरला. यावर्षी प्रथमच व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आल्या, त्यात प्रथम मुरूमगाव तर द्वितीय स्थानी कुलभट्टी शाळेने आपले नाव कोरले. मुलींच्या या स्पर्धेत कुलभट्टी संघ प्रथम तर मुरूमगाव संघाने द्वितीय स्थान प्राप्त केले. चेस या खेळ प्रकारात मुरुमगाव शाळेचा चेस पटू साद मेहबूब पठाण याने बुद्धीचे कौशल्य दाखवित कुलभट्टी च्या दिव्यांत शहा वर मात केली.
मुलींच्या चेस या खेळ प्रकारात किर्ती विजय मिस्त्री हिने कुलभट्टीच्या भारती नैताम हिला चेकमेट केले.
सर्वच खेळ प्रकारात कुलभट्टी संघ अव्वल ठरल्यामुळे प्राथमिक व माध्यमिक विभागाचे चॅम्पियन ठरली. बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सरपंचा शेवंताबाई हलामी, प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच हरीश धूर्वे, उपसरपंच प्रकाश हलामी, केंद्रप्रमुख अरुण सातपुते , मुख्याध्यापक आर. एस . चलाख, विना मडावी , पदवीधर शिक्षक डॉ व्ही .ए रामटेके, कालिदास वट्टी , चंदू रामटेके, पी. एस .कांबळे, माया भैसारे, रमशिला संगोडिया, जगदीश बावने, योगेंद्र मडावी, वि.टी. कोलते, शा . व्य.स .अध्यक्ष करणसाय हलामी, सदस्य अनिता मडावी, जी.बी .पेंदाम, विजय नंदनवार, गायत्री डी. खेवले, वाय .एन. मलिया, कुंती तुलावी, यशवंत पिदा, मनोज मडावी, आदींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. क्रीडा संमेलनाचे अहवाल वाचन क्रीडा प्रमुख एस . डब्ल्यू. गेडाम यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन संगीता भडके यांनी केले तर एन. एम . मुल्लेवार यांनी आभार मानले. क्रीडा संमेलनाच्या उत्तम व्यवस्थापना साठी पंनेमारा ग्राम समितीने परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here