कोरची : पोलिसांनी आरोपीचीच शक्कल वापरत आवळल्या मुसक्या

1062

– खुनातील आरोपीस मथुरातुन अटक
The गडविश्व

ता. प्र / कुरखेडा-कोरची, १८ जुलै : तालुक्यातील कोचीनारा येथे २ जुलै २०२३ रोजी पती पत्नीच्या जुन्या किरकोळ वादातून आरोपी पती प्रितराम धकाते यांने कुऱ्हाडीने आपल्या पत्नीची जंगलात हत्या केली तसेच बचावासाठी गेलेल्या मुलीच्या पाठीवर वार करून हाथ सुद्धा फ्रैक्चर केले होते. या घटनेनंतर आरोपी घटना स्थळावरून पसार झाला होता. मात्र कोरची पोलिसांनी तपासाचे चक्र अधिक गतीने फिरवत आरोपीचीच शक्कल वापरत त्या आरोपीला मथुरा येथून अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल १५ दिवस आरोपीने पोलीस विभागाला चकमा देत ट्रान्सपोर्टसाठी जाणाऱ्या ट्रकमध्ये बसून प्रवास केला. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हा उत्तरप्रदेश येथील मथुरा येथे साधूची वेशभूषा परिधान करून राहत असल्याची माहिती प्राप्त होताच पोलीस स्टेशन कोरची येथील सहाय्यक पोलीस निरक्षक गणेश फुलकुवर यांनी आपल्या सोबत ३ सहकाऱ्यांना घेऊन मथुरा गाठले. आरोपीला शोधताना त्याला याची कल्पना होता कामा नये म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी साधूचे वेश परिधान करून व उर्वरित पोलीस कर्मचारी यांनी रिक्षा चालक, चने विक्रीचा धंदा लावून सापळा रचून प्रितराम याला मथुरा येथे ५ दिवसानंतर पकडले.
सिने अभिनेते अमीर खान यांनी अशीच भूमिका सरफरोश या सिनेमा मध्ये साकारली होती परंतु खून करणाऱ्या आरोपिला अशा प्रकारे अटक केल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फुलकुवर हे रियल लाईफ चे अभिनेते झाले असल्याचे दिसून येत असून सर्वत्र त्यांची या कार्यवाहीमुळे प्रशंसा केली जात आहे.दरम्यान घटनेच्या दिवशी ओपीने कोचीनारा येथील काही लोकांना जिवे मारण्याची धमकी दिली होती त्यामुळे परिसरात त्याची दहशत पसरली होती. आरोपीला ताब्यात घेऊन 302, 326, 506 भादवी अंतर्गत गुन्हा केला करण्यात आलेला आहे. सादर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फुलकुवर यांच्या सोबत पोलीस कर्मचारी तेजराम मेश्राम, नरेंद्र धोंडणे, शिवचरण भालेराव यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here