-ग्रामस्थांच्या परिश्रमाचे फलित
The गडविश्व
गडचिरोली, १५ मे : कोरची (korchi) तालुक्यातील बिहीटेकला (Bihitekla) हे गाव मागील २० वर्षांपासून अवैध दारूविक्रीमुक्त आहे. हे ग्रामस्थांच्या परिश्रमाचे फलित असून नुकतेच गावाने विजयस्तंभ उभारून आनंदोत्सव साजरा केला आहे.
बिहीटेकला ग्रामपंचायत अंतर्गत बोटेकसा, बिहीटेखुर्द, बिहीटेकला या तीन गावांचा समावेश आहे. बिहीटेकला या गावामध्ये अवैध दारूविक्री मागील २० वर्षांपासून बंद आहे. यासाठी गावातील नागरिकांनी एकी करून गावाला अद्यापही दारूमुक्त ठेवले आहे. ही दारुबंदी कायम टिकून राहावी , यासाठी मुक्तीपथ तालुका टीमने वेळोवेळी बैठकीचे आयोजन करून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले व दारुबंदी मजबूत करण्यासाठी उपाययोजना सुचवल्या. अशाप्रकारे या गावाने अवैध दारू विक्रीला गावापासून दूर ठेवले आहे. सदर गावाने केलेल्या कार्यातून इतरही गावांपुढे एक आदर्श निर्माण व्हावा, यासाठी नुकतेच विजयस्तंभ उभारण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन पोलिस पाटील प्रफुल सोनकोतरी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक नैनसिंग काटेंगे, मुक्तीपथ गाव संघटनेचे श्यामकला मेश्राम, अनिता कपुडेरीया, संगीता भैसा, महादेव कुमरे मुक्तीपथ तालुका संघटक निळा किन्नाके यांच्यासह गाव संघटनेचे सदस्य व गावकरी उपस्थित होते.
(the gdv, the gadvishva, korchi, bihitekla, muktipath)