१२ डिसेंबरला जुन्या पेन्शनसाठी नागपूरात जनक्रांती महामोर्चा

243

– जिल्हास्तरीय सहविचार नियोजन सभा संपन्न
The गडविश्व
गडचिरोली, दि.०७ : महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना जिल्हा गडचिरोली ची सहविचार व नियोजन सभा स्मृती उद्यान गडचिरोली येथे बुधवार ६ डिसेंबर रोजी गुरुदेव नवघडे जिल्हाध्यक्ष म. रा. जु. पे. सं. गडचिरोली यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व नितेश कुमरे राज्यप्रमुख (वनविभाग) म.रा.जु.पे.सं. यांच्या अध्यक्षतेखाली, गजानन गेडाम (आरोग्य विभाग), विशाल काटवले (भूमी अभिलख विभाग), बापू मुनघाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी १२ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर विधान भवन येथे आयोजित पेन्शन जनक्रांती मोर्चा च्या संबंधाने सविस्तर चर्चा करून नियोजन करण्यात आले.
यावेळी नितेश कुमरे यांची महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन संघटनेच्या राज्यप्रमुख (वनविभाग) पदी निवड झाल्याबद्दल जिल्हा शाखेच्या वतीने अभिनंदन करण्यात येऊन सत्कार करण्यात आली. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना तालुका शाखा गडचिरोली ची कार्यकारीणी गठीत करण्यात येऊन जगदीश मडावी यांची अध्यक्ष पदी तर सागर आत्राम यांची सचिव पदी एकमुखाने निवड करण्यात आली. गडचिरोली शहराध्यक्ष पदी गजानन गेडाम (आरोग्य विभाग) व गडचिरोली शहर कोषाध्यक्ष पदी विशाल काटवले (भूमी अभिलेख) यांची एकमुखाने निवड करण्यात आली . तर जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदी अल्का कुमरे (कुरखेडा) यांची निवड करण्यात आली. दरम्यान उपस्थित सर्व पेन्शन शिलेदारांच्या वतीने आतापर्यंतच्या पेन्शन लढ्यातील गडचिरोली जिल्ह्याचे योगदान व पेन्शन लढा करीता करीत असलेले कार्य व मेहनत लक्षात घेता महा राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरुदेव नवघडे व जिल्हा सरचिटणीस बापू मुनघाटे तसेच संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी यांचे अभिनंदन ठराव यावेळी मांडण्यात आले. त्यास उपस्थित सर्व पेन्शन शिलेदार यांनी अनुमोदन दिले. यावेळी सभाध्यक्ष यांच्या परवानगीने उपस्थित सर्व पेन्शन शिलेदारांच्या अनुमतीने गुरुदेव नवघडे यांची महा. राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी पुनर्निवड करण्यात आली. तसेच अध्यक्ष यांच्या परवानगीने बापू मुनघाटे यांची जिल्हासचिव पदी पुनर्निवड करण्यात आली. यास सर्व उपस्थित पेन्शन शिलेदारांनी अनुमोदन दिले.या सभेला महा. राज्य जुनी पेन्शन संघटनेचे नितेश कुमरे राज्यप्रमुख (वनविभाग), श्रीकांत नवघरे क्षेत्र सहायक गडचिरोली, शेख मॅडम वनपाल, प्राची काळे मॅडम,चंद्रकांत डोईजड, राहुल चीचघरे,भारत राठोड, पांडुरंग कोवासे (वनविभाग), गणेश आखाडे जिल्हासंपर्क प्रमुख, आरमोरीचे तालूकाध्यक्ष प्रशांत ठेंगरी, निकेश बन्सोड, घनश्याम हटेवार, उमेश मसराम, गडचिरोलीचे नवनियूक्त तालुकाध्यक्ष जगदीश मडावी, सरचिटणिस सागर आत्राम, सचिन मेश्राम, कुलभूषण हेमंके, गौतम पुंडगे, खुमेद्र मेश्राम, कैलाश कोरोटे, अमरदीप भुरले, हेमंत माटे, दशरथ चलाख, किशोर सुरपाम, अंगद बावनकुडे, राकेश चचाने, राहुल खोब्रागडे, सिद्धार्थ भैसारे, माधुरी कुमरे,धानोराचे तालूकाध्यक्ष दिपक सुरपाम, माजिद शेख , अमित टेंभूर्णे, योगेश दमकोंडावार, रमेश कोवासे, निशिकांत शामकुळे, प्रशांत काळे, दोषर सहारे, कुरखेडाचे अलका कुमरे, दिपाली कन्नाके, अर्चना मरसकोल्हे, शिल्पा धानोरकर, मुलचंद शिवणकर, तुषार तिवारी, अनिल सोरते, संतोष सुरजागडे, सुरेंद्र दमाहे, कोरचीचे तालूका पदाधिकारी सुधीर गद्देवार, लोकचंद जमदाळजितेंद्र साहाळा, चामोर्शीचे अमित बारसागडे, टिकेश ढवळे, राजू सोनटक्के चामोर्शी, सर्व तालुक्याचे तालुका पदाधिकारी व बहुसंख्य पेन्शन फायटर यांची उपस्थिती होती.
सभेचे संचालन राजू सोनटक्के, प्रास्ताविक गणेश आखाडे यांनी तर उपस्थित मान्यवर तथा पेन्शन शिलेदारांचे आभार विशाल काटवले यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here