अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात होणार वाढ

661

– महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच प्रतिपादन

– मोबाईल मधील ‘ट्रॅक ॲप’ मध्ये माहिती मराठीमध्ये भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार
The गडविश्व
 मुंबई, ४ मार्च : राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २० टक्के तर मदतनीस यांच्या मानधनात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत सांगितले.
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री कुणाल पाटील, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, अतुल भातखळकर, आदिती तटकरे यांनी उपस्थित केला होता.
मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, अंगणवाड्यांमधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच नवीन मोबाईल खरेदीही करण्यात येत आहे. या मोबाईल आहे त्यामध्ये माहिती अद्ययावत करत असताना नाव इंग्रजीत भरले असले, तरीही उर्वरित सर्व माहिती मराठीमध्ये भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही मंत्री मंगल प्रभात लोढा लोढा यांनी सांगितले.

(The gadvishva) (Gadchiroli news updates) (Mumbai) ( Increase in salary of Anganwadi workers, helpers) (The gdv)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here