पिंपळगाव (हलबी) येथे सार्वजनिक वाचनालयाचे उद्‌घाटन

227

The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, १ सप्टेंबर : तालुक्यातील पिंपळगाव (हलबी) येथे १ स्पटेबर रोजी सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रकाशजी उरकुडे उपसरपंच ग्रा.पं पिपळगाव (ह) तसेच प्रमुख पाहुणे म्हणून धनिरामजी लेंढे (तमुस अध्यक्ष), भिमरावजी धोंगडे, कृष्णाजी राऊत, हिराजी बुल्ले, रोशनजी मेश्राम, कुमारी माधुरी राऊत (पो.पा.) सौ. यशोदा ठाकरे ग्रां.पं स, मुकेश भोयर ग्रा. रोजगार सेवक व जी. आर. नाकाडे ग्रामसेवक, चंद्रभानजी शंभरकर ग्रां. पं. कर्मचारी यांच्या उपस्थितेखाली पार पाडण्यात आले.
मौजा पिंपळगाव (ह.) येथे महात्मा फुले वाचनालय सलग्नित व्यायामशाळा असून विद्यार्थ्यांच्या उपयोगात नसल्यामुळे पिंपळगाव येथील विद्यार्थ्यांनी गावालगतच्या अभ्यासिकेचा ध्यास घेऊन विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यासाठी ग्रां पं. च्या सहकार्याने व गावातील लोकांच्या सहकार्याने मुलांना अभ्यास करण्याकरीता सार्वजनिक वाचनालयाची सुरुवात करून सदर वाचनालयाचे गावातील मान्यवरांच्या उपस्थितेखाली सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन समारंभ पार पाडण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here