पोळ्याच्या पार्श्वभूमीवर दारूविक्रेत्यांचा मुद्देमाल नष्ट

111

– धानोरा, गडचिरोली मुक्तिपथ टीमची कृती
The गडविश्व
गडचिरोली, १३ सप्टेंबर : पोळ्याच्या पार्श्वभूमीवर धानोरा व गडचिरोली मुक्तिपथ टीमने सामूहिक अहिंसक कृती करीत तालुक्याच्या सीमावर्ती भागातील जंगलपरिसरात असलेला जवळपास 42 ड्रम मोहफुलाचा सडवा व साहित्य नष्ट केले.
पोळा या सणाच्या निमित्ताने दारुची मोठ्या प्रमाणात मागणी असते, त्यामुळे विक्रेते हातभट्टी लावून जंगलपरिसरात दारू गाळतात. अशातच धानोरा ताुक्यातील जांभळी, सीताटोला आणि गडचिरोली तालुक्यातील रानभूमी या जंगलशिवारात दारूचे भट्ट्या व मोह सडवा असल्याची माहिती गावसंघटनेकडून मिळाली. त्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी गडचिरोली व धानोरा तालुका टीमने सामूहिक अहिंसक कृती करीत शोधमोहीम राबवली. दरम्यान जंगलपरिसरात विविध ठिकाणी मिळून आलेला 42 ड्रम मोह सडवा व साहित्य नष्ट करण्यात आले. या कृतीमुळे अवैध दारूविक्रेत्यांचे मोठे नुकसान करण्यात मुक्तिपथ चमुला यश आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here