आरमोरी भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात

850

– सात हजारांच्या लाचेची केली मागणी
The गडविश्व
गडचिरोली, २७ जून : तक्रारदार यांच्या वडिलोपर्जित शेत जमिनीच्या पोट हिस्साची मोजणी करून त्यातील एक हेक्टर जमीन मॅचअप करून ‘क’ शिट तयार करून देण्याच्या कामाकरिता ७ हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी आरमोरी भूमी अभिलेख कार्यालयातील भुकरमापक खुशाल मुखरूजी राखडे (३९) याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २६ जून रोजी कारवाई करत आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांना त्यांच्या वडिलोपर्जित शेत जमिनीची मॅचअप करून ‘क’ शिट तयार करून देण्याच्या कामाकरिता उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय आरमोरी येथील भूकरमापक रोखडे यांनी ७ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली मात्र तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली असता तक्रारीच्या अनुषंगाने सापळा कारवाई दरम्यान पंचसाक्षीदारासमक्ष भूकरमापक रोखडे यांनी सुस्पष्ट मागणी केल्यावरून कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १८९९ नुसार आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई लाप्रवी पोलीस उपअधीक्षक अनिल लोखंडे यांच्या पर्यवेक्षणात पो.नि शिवाजी राठोड, पोनि श्रीधर भोसले, पोहवा नथ्थु धोटे, पोना राजू पदमगीरवार, किशोर जौंजारकर, स्वप्नील बांबोळे, पोशि किशोर ठाकूर, संदीप उडाण, संदीप घोरमोडे, चापोहवा अनिल अंगडवार यांनी केली.

(the gdv, the gadvishva, armori, crime news, gadchiroli, acb)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here