कुंभीटोला येथे नियमबाह्य घरकुलाचे बांधकाम

1296

– संबधितावर कारवाई करण्याचे राजू मडावी यांची पत्रकार परिषदेतुन मागणी
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १३ : तालुक्यातील कुंभीटोला येथे एकाच कुटुंबातील वडील व मुलाला नियमबाह्यपणे मोदी आवास योजनेचा लाभ देण्यात आला तसेच घरकुलाचे बांधकाम करताना प्रत्यक्षात दोन घरकुल मिळून एकच बांधकाम तसेच सार्वजनिक जागा बळकावत बांधकाम करण्यात आले असा आरोप कुरखेडा येथे १० डिसेंबर रोजी कुंभीटोला येथील राजू सदरू मडावी यांनी आयोजित पत्रकार परिषदेतुन केला आहे.
कुंभीटोला येथील एकाच कुटूंबातील अंताराम कापगते व घनश्याम कापगते या वडील व मुलाल सन २०२३ – २४ मध्ये मोदी आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले. यावेळी घरकुल बांधकामाकरीता मूद्रांकावर वडिलाने मुलालाआपल्या नावावर असलेली घराची अर्धी जागा लिहून दिली मात्र त्याबाबत ग्रामपंचायत रिकार्ड मधील नमूना ८ मध्ये दर्शविण्यात आलेली १४०० स्केअर फूट जागेपेक्षा प्रत्येक्षात मौक्यावर जागा कमी आहे. त्यामूळे त्याने दोन्ही मंजूर घरकूलाचे एकत्रित बांधकाम करताना घराच्या अगदी समोर असलेल्या सार्वजनिक विहीराचा प्लेटफार्म तोडत येथील काही जागा बळकावत नियमबाह्यपणे बांधकाम केले असल्याचे दिसून येते. या संदर्भात स्थानिक ग्रामपंचायत तसेच पंचायत समिति व मुख्यकार्यपालन अधिकारी गडचिरोली यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्याच्या घरकुलाचा पुढील हप्ता थांबवित बांधकाम बंद करण्याचे आदेश त्याला देण्यात आले होते मात्र या आदेशाला न जुमानता त्याने घराचे बांधकाम केले आहे त्यामुळे नियमबाह्य बांधकाम करणाऱ्या घरकुल लाभार्थाना तसेच सार्वजनिक जागा बळकावत सुरु बांधकामाला आळा न घालता त्याला अप्रत्यक्ष प्रोत्साहन देणाऱ्या ग्राम सचिव व सरपंच तसेच वारंवार तक्रार करूनही कार्यवाही संदर्भात थातूर माथूर उत्तरे देत चालढकल करणाऱ्या घरकुल अभियंता यांचा या संदर्भात भूमिकेची निष्पक्ष चौकशी करीत कार्यवाही करण्यात यावी तसेच शासनाच्या निधीचा चुकीच्या पध्दतीने खर्च करणाऱ्याविरोधात जबाबदारी निश्चित करीत त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पत्रकार परिषदेत राजू मडावी यांनी केली आहे. दरम्यान ७ दिवसात संबधितावर कार्यवाही न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसून आंदोलन सुरु करण्याचा इशारा सुद्धा मडावी यांनी पत्रकार परिषदेतुन दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here