The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. १२ : तालुक्यातील रांगी केंद्राचे केंद्रस्तरिय शालेय बाल क्रिडां व सांस्कृतिक स्पर्धा निमनवाडा येथे माजी जि.प. अध्यक्ष मनोहर पाटिल पोरेटी यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा ११ डिसेंबर २०२४ ला पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शशिकांत साळवे सभापति कृ.उ.बा.स.गडचिरोली, प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर छायाताई मडावी सरपंच ग्रां.प.निमणवाडा, रसिकाताई कुमरे पो.पा.निमणवाडा,सुधिरजी आखाडे गट शिक्षणाधिकारी प.स.धानोरा, रूषीजी गुरनुले सदस्य ग्रा.पं.चिंगली, चेतन सुरपाम उपसरपंच ग्रा.पं.निमणवाडा, हलामी उपसरपंच रांगी, मंगलाताई बोगा सरपंच ग्रां.पं.कन्हाळगांव, मोतिराम जांगी, भजन वरखडे, ठुमराज कुकडकार अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती रांगी, विनोद लोणारे, सुनिल मडावी, लोमेश नरोटे, गंगाधर कोवे, आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्याला केंद्रातील सर्व शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व गावातील ग्रामवासिय बहुसंख्येने उपस्थित होते.
