दारू तंबाखूचे व्यसन सोडाल तर आनंदी जीवन जगाल

101

The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : एटापल्ली येथील शासकीय मूला, मुलीचे वसतिगृह येथे महाविद्यालयीन विद्यार्थी करिता व्यसनमुक्त व भयमुक्त जीवन यावर कार्यशाला घेण्यात आली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना दारू, तंबाखूचे व्यसन सोडून आनंदी जीवन जगण्याचे आवाहन करण्यात आले.
मुलींचे वस्तिगृह येथे कु. पी एन यूइके अधीक्षिका यांचे अध्यक्षतेत तर मुलांचे वस्तिगृह येथे एस एस हिवाले अधीक्षक यांचे अध्यक्षतेत कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शक मुक्तिपथ तालुका संघटक किशोर मलेवार यांनी आपले जीवणाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आपण खर्रा, तंबाखू, दारूचे व्यसनाची सवय लावू नका. तंबाखू-दारूचे व्यसनामुळे तलफ आली की अभ्यासाकडे लक्ष लागत नाही. त्यामुळे आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करुणही योग्य ते यश आपल्या पदरी पडत नाही. आपण उच्च शिक्षण घेवुन् दारू-तंबाखू व्यसन करत असलो तर शासकीय भरतीमध्ये शारीरिक चाचणीत अपयश येतो. धावन्याचे शर्यतीत, भऋण स्पर्धेतुन बाद होतो. दारू तंबाखू व्यसनामुळे आपला समाजातला मानसन्मान कमी होवून मानसिक तानतनाव वाढून एक प्रकारची भीती निर्माण होते. आजचा उच्च शिक्षित तरुण देशाचा आधारस्तंभ आहे. व्यसनमुक्त जीवन कुंटूबाचा आणि देशाचा आधार बनतो. याकरिता विद्यार्थीने व्यसनमुक्त व आरोग्यदाई जीवनाचा स्वीकार करून आपला सर्वांगीन विकास साधावा असे मार्गदर्शन करुण पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरित केले. त्यांनतर सर्च येथे आयोजित युवा निर्माण शिबिराची माहिती देऊन विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मोठ्या संखयेने विद्यार्थ्यी उपस्थित होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here