The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. १३ : उन्हाळ्यामध्ये नागरिक पाण्यासाठी धावा धाव करत असतात. लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. मात्र धानोरा शहरातील मुख्य पाईपलाईन फुटल्याने शहरातील लोकांना पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.
धानोरा शहरातील नागरिकांच्या नळाला कमीत कमी पाणी येते. पाणी मिळत नाही म्हणून काही नागरिक टील्लू पंपाद्वारे पाणी घेतात. त्यामुळे काही लोकांना कमी पाण्याचा पुरवठा होत आहे. याकडे नगरपंचायत चे दुर्लक्ष होत आहे. मुख्य चौकातील पाईपलाईन ही पाच ते सहा दिवसापासून फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने असल्याने नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
पाईपलाईन फुटल्याची माहिती झाल्याने पाईपलाईन मधून जास्ती पाणी वाया जाऊ नये म्हणून पाईपलाईन ची दुरुस्ती करण्यात येईल.
– प्रदीप बोगा
पाणीपुरवठा सभापती
नगरपंचायत धानोरा