HK PRODUCTION निर्मित झाडीपट्टीच्या ‘रूप गोजीरे’ गाण्याने पार केला १ मिलियनचा टप्पा

1719

– अल्पावधीत गाण्याची भरारी , प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद

The गडविश्व
गडचिरोली (Gadchiroli), ११ सप्टेंबर : एच.के.प्रोडक्शन (HK Production) निर्मित झाडीपट्टीतील ‘तुझे रूप गोजीरे’ (Rup Gojire Song) गाण्याने अल्पावधीतच १ मिलियन (one million view) व्यु चा टप्पा पार केला आहे.

झाडीपट्टीतील (zadipatti) नावाजलेल्या ‘एच.के. प्रोडक्शन’ युटयुब चॅनलवर झाडीपट्टीतील एका प्रेम कथेवर आधारीत ‘एच.के. प्रोडक्शन’ निर्मित ‘तुझे रूप गोजीरे’ हे गाणे अल्पावधीतच १ मिलियन पेक्षा अधिक प्रेक्षकांच्या पसंतीस आले आहे. हे गाणे झाडीपट्टीत ज्युनियर गोविंदा या नावाने ओळखले जाणारे ‘निकेश खोबरे’ (Nikesh khobre) यांनी गायले आहे. तर या गाण्याचे बोल ‘विजय गेडाम’ (vijay gedam) यांनी तयार केले आहे. गाण्याचे दिग्दर्शक होमदेव कोसमशिले यांनी केले आहे.

‘तुझे रूप गोजीरे’ गाणे युटयुबवर (you tube) आल्याच्या काही दिवसातच प्रेक्षकांना याची भुरळ पडली व अल्पावधीत हे गाणे प्रक्षकांच्या ओठावर येवू लागले. ‘एच.के. प्रोडक्शन ‘ या युटयुब चॅनलवर हे गाणे असून प्रेक्षकांचा मोठया प्रमाणत प्रतिसाद बघावयास मिळत आहे. गाण्यात नायकाची भुमिका स्वता गायक निकेष खोबरे (singer nikesh khobre) तर नायिकेची भुमिका झाडीपट्टीतीलच कलावंत रूपाली राऊत (zadipatti acter rupali raut) यांनी केले आहे. एच.के. प्रोडक्शन चे होमदेव कोसमशिले (Hk produvation Homdev kosamshile) यांनी या गाण्याकरिता अथक परिश्रम घेतले असून गाणे गडचिरोली (gadchiroli) जिल्हयातील कुरखेडा (kurkheda) तालुक्यातील अरततोंडी महादेवगड पहाडीवर (arattondi mahdev tempel) चित्रीत करण्यात आले आहे. गाणे चित्रित करीत असतांना अनेक अडचणी उद्भवल्या मात्र त्या दुर करून चांगल्या प्रकारे चित्रीत करण्यास जेवढे दिग्दर्शक होमदेव कोसमशिले यांनी परिश्रम घेतले तेवढेच चित्रीत करणाऱ्या कॅमेरामॅन व कलावंतांनीही घेतले आहे.
या गाण्याची तरूणांना भुरळ पडली असून आताही त्याच्या ओठावर गाणी गुणगुणतांनाचे चित्र आहे. हे गाणे ॲपल म्युझीक(apple music), गाणा ॲप(gana app), जीओ सावन(jio savan), स्पोटीफॉय(soptifi), वेंकी(wynk), हंगामा (hungama), रेसो (resso), ॲमेझॉन म्युझीक (Amazon music), साउंडा क्लाउड (sound cloud) इत्यादी ऑनलाईन प्लॉटफार्मवर उपलब्ध आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम वर (Facebook, Instagram) या गाण्याच्या अनेक रिल्स ही बघावयास मिळत असून अनेकांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप च्या (whatsapp) स्टेटस्वर व कॉलट्यूनवर हे गाणे आताही दिसतात. आपणही फेसबुक, इन्स्टाग्राम वर ररिल्स तयार करू शकता व आपल्या मोबाईल कॉलरट्यून (collertune) म्हणूनही सेट करू शकता.
#HKProduction #zadipatti #Homdev kosamshile #nikesh khobre #rupali raut #gadchiroli #kurkheda #arattondi #youtube #whatsapp #facebook #jio savan #amazon music # hungama #one million #

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here