अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या मुसक्या : गोवंशासह साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त

555

– दोघांना अटक
The गडविश्व
ता. प्र / सावली, १२ सप्टेंबर : अवैधरित्या गोवंशाची तस्करी करणाऱ्या मुसक्या आवळण्यात सावली पोलिसांना यश आले आहे. गोवंशासह साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोघाजणांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
बक्षीस सिंग मुक्तार सिंग (४२) रा. खदूरसाहिब जि करणतारण पंजाब, मोहम्मद आरिश मोहम्मद कुरेशी (२२) रा. बनत ता. जि. शामली उत्तरप्रदेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, ११ सप्टेंबर रोजी अवैध गोवंश वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता सकाळी ०७. ३० वाजताच्या दरम्यान तात्काळ सावली पोलीस स्टेशन समोर चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावर नाकाबंदी केली असता सीजी ०४ जेबी ७६४९ क्रमांकाचा ट्रक २५ गोवंश जनावरे अवैधरित्या वाहतूक करतांना मिळून आला. २५ गोवंश जनावरे किंमत अंदाजे २.५ लाख रुपये व ट्रक किंमत १० लाख ररुपये असा १२.५० लाख रुपये चा माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध महा.पशू संरक्षण अधि.,प्राणी छळ प्रति.अधि, महा.पोलीस अधि, मोटर वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीना अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे सा., उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे, सावली ठाणेदार आशिष बोरकर यांचे मार्गदर्शनाखाली दर्शन लाटकर, मोहन दासरवार, धिरज पिदूरकर यांनी केली आहे.

(chandrapur) (saoli) (police)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here