The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ४ जानेवारी : तालुक्यातील निमगाव येथील गणेश अलंकार विद्यालयात मंगळवार ३ जानेवारी ला सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस ‘बालिका दिन ‘म्हणून साजरा करण्यात आला.
बालिका दिनाचे औचित्य साधून विद्यालयामध्ये वर्ग ८ ते१० च्या विद्यार्थ्यांकरिता निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच “बेटी पढाव बेटी बचाव” उपक्रम राबविण्यात आला. त्यानंतर विजेत्यांना प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक घोषित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बी. डब्ल्यू.सावसाकडे, प्रमुख अतिथी शिक्षक दिवाकर भोयर, श्रीरामे मॅडम, नागदेवते आणि नागतोडे तसेच शिवणकर,गजबे, गेडाम, लोहारे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन वर्ग ९ ची विद्यार्थिनी राणी खोब्रागडे हिने तर आभार अपेक्षा वासेकर वर्ग १० हिने केले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व विद्यार्थी कर्मचारी उपस्थित होते.