– अंतिम आखणीस शासनाची मान्यता
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०८ : जिल्ह्यातील सुरजागड खाणीपासून कोनसरी येथील प्रकल्पापर्यंत खनिज सामग्री वाहतूक प्रचंड वाढेल व याकरिता विशेष खनिज वाहतुकमार्गाची (Dedicated Mineral Transport Road ची) आवश्यकता असल्यामुळे मुत्तापूर-वडलापेठ-वेलगुर-टोला- येलचिल (इजिमा) या तसेच नवेगाव मोर-कोनसरी-मुलचेरा-हेडरी ते सुरजागड खाणीपर्यंतच्या रस्त्यांचे काम हाती घेणे आवश्यक असल्याने हे रस्ते विकसित केल्याने राज्यात व राज्याबाहेर खनिज वाहतूक करणे किफायतशीर होईल. यास अनुसरुन आता नवेगाव मोर ते सुरजागड खाणीपर्यंत जाणाऱ्या ८४.६३ किमी च्या मार्गाची आखणी अंतिम करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचे शासनाने ७ फेब्रुवारी जीआर काढला आहे.
गडचिरोली हा खनिज संपत्तीने संपन्न असलेला भूभाग आहे. राज्याच्या विकसित भागांशी खनिज संपत्तीची वाहतूक सुरळीतरित्या किफायतशीर किंमतीत होण्याच्या दृष्टीने हा भाग हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तसेच केंद्र शासनाकडून प्रस्तावित दुर्ग-हैद्राबाद प्रवेश नियंत्रित शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गास जोडल्यामुळे देशाच्या अन्य भागांशी जोडला जाईल. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात रोजगार निर्मिती होऊन त्या भागांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. मे. लॉयड्स मेटल्स व एनर्जी लि. या कोनसरी येथील एक “एकात्मिक पोलाद (Integrated Steel Project) प्रकल्पामुळे” सुमारे १५,००० रोजगार निर्मिती होणार आहे व यामुळे या परिसराचा सामाजिक व आर्थिक विकास देखील होईल. तसेच या रस्त्यामुळे या भागातील आदिवासी गावांना आरोग्य विषयक सुविधा बरोबर इतर शासकीय योजनांचा लाभ त्वरित मिळण्यास मदत होईल. सदर कोनसरी येथील प्रकल्पाचे विस्तारीकरण आगामी एक-दोन वर्षामध्ये टप्या-टप्याने पूर्ण होत असून या विस्तारित प्रकल्पाकरिता सुरजागड येथील खाणीमधून साधनसामग्रीची वाहतुक मोठ्या प्रमाणात राहील. त्यामुळे सुरजागड खाणीपासून कोनसरी येथील प्रकल्पापर्यंत खनिज सामग्री वाहतूक प्रचंड वाढेल व याकरिता विशेष खनिज वाहतुकमार्गाची (Dedicated Mineral Transport Road ची) आवश्यकता असल्यामुळे मुत्तापूर-वडलापेठ-वेलगुर-टोला- येलचिल (इजिमा) या तसेच नवेगाव मोर-कोनसरी-मुलचेरा-हेडरी ते सुरजागड खाणीपर्यंतच्या रस्त्यांचे काम हाती घेणे आवश्यक आहे. हे रस्ते विकसित केल्याने राज्यात व राज्याबाहेर खनिज वाहतूक करणे किफायतशीर होईल. यास अनुसरुन आता नवेगाव मोर ते सुरजागड खाणीपर्यंत जाणाऱ्या मार्गाची आखणी अंतिम करण्यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मार्गदर्शक तत्वांना (इंडियन रोड काँग्रेस विशेष पब्लिकेशन क्र.१९:२०२० च्या मूल्यांकन मॅट्रीक्स) अनुसरून व प्रत्यक्ष स्थळ पाहणी नुसार विविध पर्यायी आखणींचा अभ्यास केला आहे. तुलनात्मक दृष्टया सर्वाधिक सुयोग्य अशी आखणी खालील भागानुसार अंतिम आखणी म्हणून महामंडळाने प्रस्तावित केली आहे. सदर महामार्ग नवेगाव मोर-कोनसरी-मुळचेरा-हेदरी ते सुरजागड असा ८४.६३ किमीचा आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत शासन मान्यतेसाठी सादर केलेल्या या आखणीस अंतिम आखणी म्हणून शासन मान्यता दिली आहे. तसेच सदर द्रुतगती महामार्गाचा विकास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे असेही शासन निर्णयात जारी केले आहे.