– नक्षली घटनास्थळावरून पसार
The गडविश्व
गडचिरोली, दि.०८ : जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वांगेतुरीपासून 7 किमी पूर्वेला हिद्दूर परिसरात काल पोलीस नक्षल चकमक उडाली. या चकमकीत पोलीस दलाने प्रत्युत्तर दिल्यावर घनदाट जंगल आणि अंधाराचा फायदा घेत नक्षलवादी पळून गेले असून घटनास्थळावरून नक्षल साहित्य जप्त करण्यात आले आहेत अशी माहिती पोलीस दलाने दिली आहे.
काल संध्याकाळी पोलीस दलास एक विश्वासार्ह माहिती मिळाली की सशस्त्र नक्षली कॅडर कांकेर – नारायणपूर – गडचिरोली जाणाऱ्या त्रिकोणी रस्त्याच्या पॉइंटवरील वांगेतुरीपासून 7 किमी पूर्वेला हिद्दूर गावात विध्वंसक कारवाया करण्यासाठी नव्याने उघडलेल्या वांगेतुरी आणि गर्देवाडा चौक्यांची रेकी करण्याच्या उद्देशाने गावात तळ ठोकून आहेत. या माहितीच्या आधारे अपर पोलीस अधीक्षक अभियान यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चार C60 पार्टी समावेश असलेले एक पथक सदर भागात शोध मोहिमेवर पाठवण्यात आले आणि हिद्दूर गावापूर्वी 500 मीटर अंतरावर सुमारे सात वाजताच्या सुमारास त्यांच्यावर नक्षल्यांनी जोरदार गोळीबार केला. पोलीस दलाने प्रत्युत्तर दिल्यावर घनदाट जंगल आणि अंधाराचा फायदा घेत नक्षलवादी पळून गेले. परिसरात झडती घेतली असता – पिट्टू, स्फोटक साहित्य, वायरचे बंडल, आयईडी बॅटरी, डिटोनेटर्स, क्लेमोर माइन्सचे हुक, सोलर पॅनेल आणि नक्षल साहित्य इत्यादी जप्त करण्यात आले आहेत. त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबवले जात आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news, vangeturi, gardewada, yatish deshmukh, c60 police)