–मुक्तिपथ व पोलीस विभाग आढावा बैठक संपन्न
The गडविश्व
गडचिरोली, दि.२३ : जिल्ह्यात दसरूबंदी आहे तरी मात्र छुप्या मार्गाने दारूची विक्री केली जाते. गडचिरोली जिल्ह्यात अनेक तालुक्यात बदलीनुसार नवीन पोलीस निरीक्षक व उपविभागीय अधिकारी रुजू झाल्याने, मुक्तिपथ अभियानाची व कामाची माहिती, मुक्तिपथ तालुका संघटक यांचे सोबत परिचय व समन्वय निर्माण होऊन दारू व तंबाखूबंदीसाठी अधिक कारवाया करता याव्या या हेतूने पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे मुक्तिपथ अभियान व पोलीस विभागाच्या समन्वयातून होणाऱ्या कामाची आढावा बैठक नुकतीच १९ मार्च रोजी पोलीस विभाग एकलव्य सभागृहामध्ये दुपारी संपन्न झाली यावेळी पोलीस अधीक्षक यांनी मार्गदर्शन करतांना होलसेल दारू विक्रेत्यांची माहिती द्या, कारवाई करू असे प्रतिपादन केले.
सदर बैठक दुपारी १२.३० वाजता सुरु होऊन २.३० वाजता संपन्न झाली. बैठकीला पोलीस अधीक्षक निलोत्पल, मुक्तिपथचे प्रभारी संचालक संतोष सावळकर, दारूबंदी पथकाचे प्रमुख उल्हास भुसारी तसेच सर्व तालुक्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक व १२ हि तालुक्याचे मुक्तिपथचे तालुका संघटक बैठकीला उपस्थितीत होते. पुढे बोलतांना पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी
दारूविक्री स्थिती, यश, अडचणी मुक्तिपथ चमू कडून समजून घेत, मुक्तिपथने होलसेल, मोठ्या दारू विक्रेत्यांची माहिती पोलीस विभागाला वेळोवेळी द्यावी, त्यानुसार नियोजन पूर्वक निश्चित कारवाई केली जाईल. गरजेच्या ठिकाणी गावातील महत्वाच्या व्यक्तीने पंच व साक्षीदार म्हणून पुढे आले पाहिजे. तसेच निवडणुकीच्या काळात अवैध दारूसाठा आढळल्यास पीआय, एसडीपीओ यांना माहिती देऊन काय कृती केली पाहिजे इत्यादी बाबत मार्गदर्शन व सूचना केल्या.
मुक्तिपथ अभियान गडचिरोली जिल्ह्यात कशा पद्धतीने काम करते, रचना कार्यपद्धती, निवडक आकडेवारी, विविध समित्या, दारूमुक्त निवडकीसाठी मुक्तिपथ द्वारा केली जाणारी कृती इत्यादी बाबत संतोष सावळकर यांनी नव्याने रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक व उपविभागीय अधिकारी यांना माहिती समजून सांगितली. तालुका पातळीवर दारू व तंबाखू विक्री बाबत काय स्थिती, अडचणी आहे, याबाबत प्रत्येक तालुका संघटकाने सविस्तर माहिती सांगतिली.
पुढील आढावा बैठक लवकरच घेतली जाईल असे पोलीस अधीक्षकांनी सांगतिले. बैठकीचे प्रास्ताविक व सांगता उल्हास भुसारी यांनी केली.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )