– २४ मार्च जागतिक क्षयरोग दिन
The गडविश्व
गडचिरोली, दि.२३ : दरवर्षी २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त आज जिल्हा सामान्य रुग्णालय येथे राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत ‘होय आपण टीबीचा अंत करु शकतो’ या घोषवाक्याने क्षयरोग जनजागरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे तर प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बागराज धुर्वे, भिषकतज्ञ डॉ. नागदेवते, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. अमित साळवे, डॉ. पंकज हेमके, डॉ. प्रफुल गोरे, डॉ. रुपेश पेंदाम उपस्थित होते.
डॉ. प्रताप शिंदे यांनी औषधाला दाद न देणाऱ्या क्षयरोगाबद्दल (एमडीआर) निदान व उपचार जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध असुन त्याचा पुरेपुर लाभ (CBNAAT) व (TruaNaat) यंत्राद्वारे घेण्याचे आवाहन केले. क्षयरोग औषोधोपचार व सकस आहार याबाबत आरोग्यसेवक व आशा कार्यकर्त्या यांनी रुग्णास वेळोवेळी माहिती देण्याचेही त्यांनी सांगीतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सचिन हेमके यांनी केले. क्षयरोग हा गंभीर आजार असुन या आजारावर नियंत्रण करण्याचे उद्दीष्ट्य साध्य करण्यासाठी नागरिकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले. तर डॉ. नागदेवते यांनी देखील मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश खडसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अनिल चव्हाण, मनिष बोदेले, राहुल रायपूरे, विलास भैसारे, लता येवले, अनिल कतलपवार, प्रमोद काळबांधे, राकेश आकनुरवार यांनी मेहनत घेतली. यावेळी आरोग्य कर्मचारी व प्रशिक्षण घेणाऱ्या आरोग्य सेविका व अधिपरिचारिका जिल्हा क्षयरोग केंद्र, गडचिरोली येथील कर्मचारी उपस्थित होते.