गणेश भक्तानी केला मुस्लिम भाविकांचा सत्कार
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि.१६ : सर्व धर्म समभाव हा शहराचा मूल-भाव आहे. येथील सर्व धर्मीय नागरीक एकमेकांचा सन उत्साहात उत्साहाने सहभागी होत असतात. याचाच परिचय देत आज सोमवार रोजी ईद मिलादुन्नबी निमित्त शहरातून निघालेल्या मुस्लिम समाजाची मिरवणूक राणा प्रताप वार्डात श्री गणेश उत्सव मंडळाचा पेंडाल समोर पोहचताच येथील मंडळाच्या वतीने मुस्लिम समाज बांधवाची गळा भेट घेत स्वागत करण्यात आले व ईदचा शुभेच्छा देण्यात आल्या तसेच शरबत वितरण करीत सर्व धर्म समभावाचा संदेश देण्यात आला.
या प्रसंगी शिवसेना उबाठा गटाचे तालुका प्रमुख तथा नगरसेवक आशिष काळे, श्री गणेश मंडळाचे अध्यक्ष हेमंत नरोटे, सचिव भावेश मुंगणकर, उपाध्यक्ष सागर पडोळे, अमोल नरोटे, इम्रान पठान, बाळू देशमुख, आकाश देशमुख, राजू देशमुख, उमेश मूंगणकर, पूरषोत्तम मुंगनकर, अतूल चौहान, उस्मान पठान, ए यु मेश्राम, कृष्णा मेश्राम, ओंकार नैताम, प्रविण नैताम, कुणाल रोकडे, हरीश मडावी तसेच गणेश भक्त मंडळी व मुस्लिम समाज बांधव हजर होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews )