The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि.१६ : तालुका मुख्यालया नजीकच्या गेवर्धा येथे ईद मिलादुन्नबी सोमवार १६ सप्टेंबर रोजी सकाळी ८:३० वाजता येथील रजा जामा मस्जिद येथून पैगंबर मोहम्मद यांचे गुणगान करीत मुस्लिम कमेटी गेवर्धा जश्ने ईद मिलादुन्नबी कमेटीचा वतीने मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणूक मस्जिद चौक येथून मार्गक्रमण करीत ग्राम पंचायत चौक, नेहरू चौक, ते बुद्ध विहार मार्गे पून्हा रज़ा जामा मस्जिद येथे पोहचत जुलूस चे समारोप् करण्यात आले.
मस्जिद येथे समाजाचे ज्येष्ट सदस्य शमीउल्ला खा पठान यांच्या हस्ते धार्मिक ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमात जामा मस्जिद चे अध्यक्ष डॉ. नासिर पठान, उपाध्यक्ष भोलू भाई पठान, सचिव व ग्राम पंचायत सदस्य रोशन अली सय्यद, सहसचिव ताहिर शेख, इंतेजामिया कमेटी अध्यक्ष मुजफ्फर पठान, सचिव सर्फराज मिर्झा , वरिष्ठ सदस्य खलील शेख, निजामुद्दीन शेख, हफीज खा पठान,रेहाज शेख, बबलू भाई शेख, रहेमान् पठान, मोहीन शेख, ह खान, जलील शेख, तबरोज शेख, अताउला खान, फिरोज कूरैशी, हम्जा शेख, तैसीम मिर्झा, फैजान पठान, जुनेद् शेख, रेहान शेख, मुन्ना सय्यद, जिब्राइल् शेख, सोहेल खान, रहेमत सय्यद,नवेद शेख, रेहान शेख, तसेच मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews )