– भाई ॲड. राजेंद्र कोरडे यांची प्रमुख उपस्थिती
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०४ : शेतकरी कामगार पक्षाने येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत गडचिरोली आणि आरमोरी विधानसभा क्षेत्रावर महाविकास आघाडीकडे दावेदारी केलेली आहे. तसेच गडचिरोली विधानसभा क्षेत्राकरीता पक्षाच्या वतीने जयश्रीताई जराते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने व्यापक प्रचार – प्रसाराचा भाग म्हणून गडचिरोली विधानसभेतील सर्व जिल्हा परिषद क्षेत्रात कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. तालुक्यातील गुरवळा येथे शुक्रवार ६ सप्टेंबर रोजी येवली – मुडझा जिल्हा परिषद क्षेत्राच्या मेळाव्याने जयश्रीताई जराते यांच्या प्रचाराचे नारळ फोडण्यात येणार आहे.
या कार्यकर्ता मेळाव्याचे उद्घाटन शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती कार्यालयीन चिटणीस भाई ॲड. राजेंद्र कोरडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सहउद्घाटक म्हणून जयश्रीताई जराते तर पक्षाच्या आदिवासी, भटके – विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते अध्यक्षस्थानी राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून मध्यवर्ती समिती सदस्य भाई शामसुंदर उराडे, जिल्हा सहचिटणीस संजय दुधबळे, जिल्हा समिती सदस्य डाॅ. गुरुदास सेमस्कर, तुळशिदास भैसारे, युवक नेते अक्षय कोसनकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कविता ठाकरे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष गुड्डू हुलके, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अभिलाषा मंडोगडे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शोएब पटेल, शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोविंदा बाबनवाडे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष पवित्र दास, महामार्ग बाधित शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभाकर गव्हारे, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष रामदास आलाम, भटके – विमुक्त जिल्हाध्यक्ष डंबाजी भोयर, शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष शर्मीश वासनिक, गुरवळाच्या सरपंच जयाताई मंटकवार तर विशेष अतिथी म्हणून गुरवळाचे माजी सरपंच गजानन मेश्राम, निशाताई आयतुलवार, जय भारत मच्छिमारी सहकारी संस्था, गुरवळाचे अध्यक्ष रमेश गेडाम, वाल्मीकी मत्स्यपालन सहकारी संस्था, येवलीचे अध्यक्ष मोरेश्वर शेंडे, विजय भोयर, हिरा मत्स्यपालन सहकारी संस्था, हिरापूरचे अध्यक्ष बालाजी भोयर, मारोती कांबळे, वाल्मीकी मत्स्यपालन सहकारी संस्था, मुडझाचे अध्यक्ष लक्ष्मण शेंडे, खुशाल मेश्राम, सुधाकर जराते, विलास जराते प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्या दरम्यान भाई रामदास जराते, जयश्रीताई जराते यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या ढिवर मोहल्ला सुधार प्रकल्पांतर्गत घरकुलांचे भूमिपूजनही प्रमुख अतिथी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यकर्ता मेळाव्याला येवली – मुडझा जिल्हा परिषद गटातील शेकापच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रकांत भोयर, विनोद मेश्राम, पोर्णिमा शेन्डे, महेंद्र जराते, संदिप गुरनूले, मिना गेडाम, देविदास मडावी, मुरलीधर गोटा, पोटेगावच्या माजी सरपंच निर्मला सुरपाम, हरिदास गेडाम, दामोदर चुधरी, अविनाश कोहळे, विलास अडेंगवार, माणिक गावळे, प्रदिप मेश्राम, रमेश ठाकरे, कालिदास जराते, भास्कर ठाकरे, अनिल मनोहर ठाकरे, वसंत चौधरी, विनायक मोहुर्ले, उमाजी मुनघाटे, विनोद गेडाम, ईश्वर कोवासे, अरुण आलाम, तुळशिराम मडावी, पुरणशहा मडावी, रविंद्र बोदलकर, देविदास फाफनवाडे, प्रफुल गेडाम, कृष्णाजी तुनकलवार, साधू नरोटे, गणू नरोटे, बुधू नरोटे, झूरु कोरामी,विनोद पोटावी, प्रकाश उसेंडी, मोरेश्वर तुमरेटी, प्रफुल तुमरेटी, कोंडूजी मडावी, उमेश मडावी, मंगलाबाई सुरपाम, प्रतिभा मोहुर्ले, गिताताई मडावी, सुनंदाबाई उसेंडी, संतोष वड्डे, शामराव उसेंडी, वसंत उसेंडी, प्रकाश गावळे, पांडुरंग उसेंडी, कवडूजी गेडाम, सुधाकर वड्डे, धनसिंग बैस, सुनिल वड्डे, सनकू पोटावी, महेश उसेंडी, देविदास आतला, दिवाकर पालकवार, रुपेश चुधरी, दिलीप भूरसे, नेताजी रोहणकर, हिवराज भोयर, छगन कोसनकर, राहुल गेडाम, विलास गेडाम, यमाजी गेडाम, विलास मेश्राम, पांडुरंग नेंचलवार यांनी केले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice )