गडचिरोली : चामोर्शी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाने दिले आदेश, काय आहे प्रकरण ? 

3066

– न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होणार काय ? 
The गडविश्व
गडचिरोली, २४ मे  : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या दरम्यान चामोर्शी पोलीस ठाण्यात अतुल गण्यारपवार यांना पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले आहे त्यामुळे पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली असून चामोर्शी पोलीस ठाण्याचा कारभार खुद्द पोलीस निरीक्षक खांडवे यांच्याकडे असल्याने न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होणार काय ? याकडे लक्ष लागले आहे.
२० एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास चामोर्शी पोलीस ठाण्यात लाथाबुक्क्या व बुटाने मारहाण केल्याचा आरोप गण्यारपवार यांनी पोलिस निरीक्षक राजेश खांडवेंवर केला होता. दरम्यान या मारहाणीत गण्यारपवार यांचा डावा हात फ्रॅक्चर झाले होते.
मारहाण प्रकरण तापून पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर गुन्हा नोंदवावा तसेच बडतर्फ करण्यात यावे यासाठी चामोर्शी येथे आंदोलन झाले होते. तर अतुल गण्यारपवार यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद न झाल्याने त्यांनी ॲड.ठाकरे यांच्यामार्फत चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात धाव घेत ॲड. ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.केदार यांनी गण्यारपवार यांच्या वतीने बाजू मांडली. २० मे रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर कलम २९४, ३२४, ३२६ ३४२ भादंविनुसार गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिल्याचे कळते. तर या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ जून रोजी होणार असल्याचेही कळते.
मात्र चामोर्शी पोलीस ठाण्याचा कारभार पो.नि. राजेश खांडवे यांच्याकडेच आहे. त्यामुळे न्यायालयीन आदेशानुसार ते स्वत:विरुध्द गुन्हा नोंद करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष वेधले आहे.
(the gdv, the gadvishva, chamorshi, atul ganyarpawar, rajesh khndve), gadchiroli news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here