गडचिरोली : फसवणुक करणाऱ्या तिन आरोपींना सश्रम कारावास

177

– मुख्य न्यायदंडाधिकारी स. पू. सदाफळे यांचा न्यायनिर्वाळा
The गडविश्व
गडचिरोली, दि.२१ : शहरातील वासुदेव गणुजी आलाम यांची फसवणुक केल्या प्रकरणी तिघांना सश्रम कारावास व २२ लाख ५० हजारांच्या दंडाची शिक्षा मुख्य न्यायदंडाधिकारी स. पू. सदाफळे यांनी ठोठावली आहे. आरोपीमध्ये शबाना जावेद पठाण, जावेंद मेहमुदखों पठाण, दयानंद गोपाळाजी निलेकर यांचा समावेश आहे.
१८ ऑक्टोबर २०१४ रोजी वासुदेव गणुजी आलाम रा. रामनगर यांनी आरोपी शबाना जावेद पठाण रा. रामनगर गडचिरोली व ईतर ०७ यांनी फसवणुक केल्या प्रकरणी पोलीस स्टेशन गडचिरोली येथे तक्रार दाखल केली असता कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश माने यांनी पोलीस निरीक्षक सा. गडचिरोली यांचे मार्गदर्शनाखाली करुन आरोपीतांविरुध्द भरपुर व सबळ पुरावा मिळुन आल्याने दोषारोपत्र दाखल केले असता, आर. सी. सी. नं. १५/२०१४ नुसार स. पू. सदाफळे, मुख्य न्यायदंडाधिकारी गडचिरोली यांचे न्यायालयात खटला चालवुन सहाय्यक अभियोक्ता यांचे युक्तीवाद ग्राह्य धरुन १९ डिसेंबर २०२३ रोजी स. पू. सदाफळे, मुख्य न्यायदंडाधिकारी सा. यांचे न्यायालयाने आरोपी शबाना जावेद पठाण,जावेंद मेहमुदखों पठाण, दयानंद गोपाळाजी निलेकर यांना कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब) भा.द.वी. अन्वये दोषी धरुन तिन्ही आरोपींना ०७ वर्ष सश्रम कारावास व बावीस लाख पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सदर तिन्ही आरोपीतांची चंद्रपुर कारागृह येथे रवानगी करण्यात आली आहे.
सरकार तर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अमर फुलझेले तसेच कोर्ट पैरवी पोहवा/२२७७ दिनकर मेश्राम, कोर्ट मोहरर पोअं/३३९१ हेमराज बोधनकर यांनी आरोपीस शिक्षा होणेस कामकाज पाहीले व सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here